कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

सावंतवाडी शहरातील अडकून पडलेली विकासकामे तातडीने मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा – सावंतवाडीचे माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, नासीर शेख यांची पालकमंत्र्यांककडे मागणी

सावंतवाडी ता. ०७ : सावंतवाडी शहरातील अडकून पडलेली विकासकामे तातडीने मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सावंतवाडीचे माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, नासीर शेख यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यामध्ये त्यांनी मोती तलावाचा कोसळलेला कठडा जलद गतीने बांधण्यात यावा त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, शहरात भूमिगत गटार बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, शहरात मंजूर झालेल्या नळपाणी योजनेला तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, भूमिगत विद्युत भारीत योजना तातडीने मंजूर करण्यात यावा, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी किंवा त्यावर तत्सम उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, सुसज्ज पॅव्हिलीयन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ डॉक्टरांची नियुक्ती करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!