विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी द्वारा आयोजित राज्यस्तरीय ‘द रियल हिरो पुरस्कार 2022’ वितरण सोहळा उत्सहात संपन्न
*विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी द्वारा आयोजित राज्यस्तरीय ‘द रियल हिरो पुरस्कार 2022′ वितरण सोहळा उत्सहात संपन्न*.
तसे पाहिले तर या क्षेत्रात काम करणारे सर्वजण द रियल हिरो आहेत. *द रियल हिरो 2022* या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या काही निवडक सर्पमित्र तथा प्राणीमित्र यांची निवड झाली होती.यात अनिल गावडे ( कुडाळ-पिंगुळी ); महेश राऊळ (वेंगुर्ला-तुळस); डॉ. रवींद्रनाथ रेडकर (सावंतवाडी-सातार्डा); स्वप्निल गोसावी (मालवण-चिंदर); दिपक दुतोंडकर (वेंगुर्ला-आडेली); प्रदिप बाणे (देवगड-पडेल); विट्ठल गवस (झोळबे दोडमार्ग) यज्ञेश खरात (कणकवली) यांची निवड करण्यात आली होती.
या सर्व हीरोंचा सत्कार २३ सप्टेबर रोजी हिंगोली येथे महावीर भवन, रामलीला मैदान देशमुख सभागृहाजवळ मोठ्या दिमाखात पार पडला.
*’द रियल हिरो 2022*’ या पुरस्कारासाठी निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्पमित्रांना मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.गुरुवर्य सर्प अभ्यासक तथा सर्पतज्ञ निलिमकुमार खैरेजी आणि डॉ. संजयजी नाकाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील काही निवडक सर्पमित्र तथा प्राणीमित्र, सर्प अभ्यासक अशा अनेक हिरोंना *”द रियल हिरो 2022*’ आणि काही महिलांना *”शूर तेजस्विनी पुरस्कार 2022*” देऊन सन्मानित करण्यात आले.
कुणाच्याही घरात किंवा लोकवस्तीमध्ये एखादा वन्यजीव, प्राणी-पक्षी आला असेल, किंवा त्यातील एखाद्या जखमी वन्यजीव असेल तर त्या प्राण्याचा सुखरूपपणे बचाव करून गरज असल्यास त्याच्यावर योग्य तो उपचार करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित रित्या सोडण्याचे काम हे हीरो आजपर्यंत करत आलेले आहेत.
रात्र,-दिवस ,ऊन-पाऊस, तहान-भूक याची तमा न बाळगता हे हिरो आपलं कार्य करीत असतात. त्यांच्या या कार्याची योग्य ती दखल घेऊन हिंगोली येथील प्राणिमित्र तथा सर्पमित्र श्री विजयराज पाटील आणि मित्र मंडळ यांनी या सर्व हिरोंचा *द रियल हिरो अवॉर्ड 2022* देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला.
या सत्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित झाले होते. त्यात गुरुवर्य सर्प अभ्यासक जागतिक सर्प तज्ञ निलीम कुमार खैरे, डॉ. संजयजी नाकाडे. श्री देवदत्त शेळके, डॉ. श्रीधर कंदी श्री गणेश भाऊ मेहंदळे, डॉ. म्हस्के, आमदार संजय बांगर, सर्प अभ्यासक डॉ. कुणाल साळुंखे तसेच या पूर्ण कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आयोजक श्री विजयराज पाटील साहेब अशा अनेक मान्यवरच्या उपस्थितीत हा *”द रियल हिरो अवॉर्ड 2022″* आणि *”शूर तेजस्विनी पुरस्कार 2022*” चा सन्मान सत्कार सोहळा पार पडला. याबद्दल अनिल गावडे, आणि महेश राऊळ यांनी विजयराज पाटील, तसेच सिंधुुर्गातील मानद वन्यजीव रक्षक श्री काका भिसे आणि वनविभाग यांचेही विशेष आभार मानले.

