🟥 दिव्यागांना शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लवकरच शिक्षण विभागाची बैठक घेऊन धोरण निश्चित करण्यात येणार ; शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.१ ऑक्टोबर :-* दिव्यागांना शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लवकरच शिक्षण विभागाची बैठक घेऊन धोरण निश्चित करण्यात येणार आहे असे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ रूपाली पाटील यांना आश्वासन दिले.
दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष विषय योजनेची पाठ्यपुस्तके छपाई करून देणे,सर्व प्रवर्गाच्या दिव्यांगत्वानुसार समान संधी देणे.तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक सुविधा शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांच्या अधिकारात उपलब्ध करून देणेबाबत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना वेंगुर्ले येथे साहस प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले.
साहस प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनीं एकत्र येऊन स्थापन केली असून ही संस्था दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग बांधव यांच्या शिक्षण,आरोग्य,पुनर्वसन तसेच दिव्यांगांचा सर्वांगीण विकास,न्याय व हक्क यासाठी कार्यरत आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,
संस्थेतील विश्वस्तांनी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी लेखनिक सुविधा मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लेखनिक संबंधित चा निर्णय पारित करून घेतला . जी सुविधा फक्त दहावी व बारावीला लेखनिक सुविधा होती ती पहिलीपासून बारावीपर्यंत तसेच उच्च शिक्षणामध्ये आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखणीक सुविधा उपलब्ध झाली आहे . याचा लाभ महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थी घेत आहेत.
तसेच शासन निर्णयातील सुविधेनुसार अंशतः अंध विद्यार्थिनीने इयत्ता दहावीला मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिकेची मागणी नियमाच्या अधीन राहून केली होती. परंतु मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिकेची मागणी फेटाळत मोठ्या अक्षराची प्रश्नपत्रिका देणार नसल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. यांनी पाठवले.
दिव्यांग विद्यार्थिनीचा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकार 2016,व शासन निर्णयानुसारचा हक्क, अधिकार डावलला गेल्याने तिला न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले. यासाठी साहस संस्थेने सर्वतोपरी सहकार्य केले आणि या विद्यार्थिनीला न्याय मिळाला. या विद्यार्थिनीमुळे महाराष्ट्रातील अंशतः अंध हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.
विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता 21 प्रकारातील विशेष गरजा असणाऱ्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना सामावित शिक्षणाद्वारे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे आहे. सद्य स्थितीत समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमाची अंमलबजावणी जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये सुरू आहे. परंतु शासन निर्णय (संदर्भ क्र.3 दि 30 जुलै 2019 ) हा असून देखील वास्तवात अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनात येत आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

