🟥 शाळकरी विद्यार्थी अपहरण सारखे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करा ; रुपेश राऊळ
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_.
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि-०१:-* गेल्या काही दिवसापासून चोऱ्या, अपहरणाचा प्रयत्न सारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.यासाठी पोलिसांनी खास मोहीम हाती घेतली पाहिजे अशी अपेक्षा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत त्यामुळे आंतरराज्य पोलीस समन्वय हवा आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर गोवा, कर्नाटक राज्य आहे. त्यामुळे चोऱ्या किंवा अपहरणाचा प्रयत्न करणारे पळून जातात त्यामुळे आंतरराज्य पोलीस समन्वय हवा.
दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदीरात देवीची किंमती प्रभावळ चोरीला गेले. या चोरीची सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पण चोर पळून गेले. ते अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. भक्त शांत संयमी आहेत. या घटनेमुळे लोकभावनाचा आदर राखला जाईल अशी कृती पोलीसांनी केली पाहिजे.
सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठावर बसून रात्रीच्या वेळी मोती तलावातील मासे परप्रांतीय लोक काढत आहेत. तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्यात परप्रांतीय लोकांचे हे चाळे कैद झालेले असतील. सीसीटीव्ही कॅमेरात असे अनेक प्रकार कैद झालेले असतील पण त्याबद्दल पोलीसांनी जागरूक राहून नागरिकांना सतर्क केले पाहिजे असे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांना दिलेल्या पत्रात सांगितले.
आज परप्रांतीय कामगार, व्यावसायिक व फिरते विक्रेते दिसून येतात. त्यांची नोंद पोलीस ठाण्यात फोटो, पत्ता सह ठेवली पाहिजे. घर मालकांनी भाडे तत्वावर ठेवले असेल तर त्यांनी पोलिसांना कळवले आहे किंवा कसे हे तपासून पाहिले पाहिजे. तसेच परप्रांतीय विविध प्रकारच्या वस्तू विक्री करण्यासाठी गावोगावी फिरताना दिसतात त्यावेळी सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. त्यातून विद्यार्थी अपहरण, मंगळसूत्र पळविणे, चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे गावोगावी फिरताना दिसणाऱ्याची चौकशी केली पाहिजे. शालेय विद्यार्थी अपहरण सारख्या प्रकाराची चर्चा सुरू आहे. तसाच प्रकार बांदा येथे घडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी जलदगतीने उपाययोजना आखल्या पाहिजेत अशी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

