*🟥 देवसू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ यांचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सेवा निवृत्ती निमित्त सत्कार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी , दि१ऑक्टोबर.*
देवसू ओवळीये पारपोली या तीन गावच्या मुलांसाठी माध्यमिक विद्यालयाची मुहूर्तमेढ छत्तीस वर्षांपूर्वी तिन्ही गावातील दूरदृष्टी असणाऱ्या व नेतृत्व करणाऱ्या लोकांनी रोवली त्या लोकांबरोबर सुरुवातीपासून ज्ञानदानाचे काम करत आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होताना तीनही गावातील ग्रामस्थांनी, माजी विद्यार्थ्यांनी अतिशय भावनिक होत मुख्याध्यापक यांना श्री विश्वनाथ राऊळ यांना निवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ यांनी आपल्या ३६ वर्षाच्या शैक्षणिक सेवेत शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच भौतिक सुविधांसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे या आदर्श शाळेसह त्यानी जनमानसात आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. असे गौरवोद्दगार गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ लवू सावंत यांनी काढले.
यावेळी व्यासपिठावर
विश्वनाथ राऊळ यांचे वडील रामचंद्र राऊळ, पत्नी सौ सुनिता राऊळ, गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मोहन गवस, उपाध्यक्ष प्रमोद परब, सांगेली हायस्कूल व कॉलेजचे प्राचार्य रामचंद्र घावरे, आंबोली सैनिक स्कूलचे सुरेश गावडे, युनियन इंग्लिश स्कूल आंबोलीचे मुख्याध्यापक सुरेश पाटील, देवसू देवस्थान मानकरी हनुमंत सावंत, वाय डी सावंत, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, लक्ष्मण पावसकर, सदानंद सावंत, पुरुषोत्तम राऊळ, संदेश गुरव, शंकर राऊळ, विठ्ठल सावंत, ओवळीये उपसरपंच सागर सावंत, अरूण परब, राजेश परब, राजेश सावंत, अविनाश सावंत, आनंद राऊळ, संभाजी सावंत, दाजी परब, शशिकांत परब, कृष्णा परब आदी मान्यवर उपस्थित होते. सांगेली जुनियर कॉलेजचे प्राचार्य रामचंद्र घावरे यांनी विश्वनाथ राऊळ हे शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याच्या ऊर्जेचा स्त्रोत असुन त्यांनी शैक्षणिक कार्य हे व्रत मानून कार्य केल्याचे असल्याचे सांगितले. आंबोली सैनिक स्कूल चे प्राचार्य सुरेश गावडे यांनी विश्वनाथ राऊळ यांनी शिक्षण आणि समाज या दोन्ही क्षेत्रात सकारात्मक प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगत त्यांची धडपड कौतुकास्पद असल्याचे सांगितले. लक्ष्मण पावसकर संदेश गुरव दत्ताराम जाधव आणि राजेश सावंत यांनीही विश्वनाथ राऊळ यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विश्वनाथ राऊळ यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विश्वनाथ राऊळ यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा त्यांचे माजी विद्यार्थी व सांगेली माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक हनुमंत नाईक यांनी घेतला तसेच अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देवसू येथिल माजी विद्यार्थी व अष्टपैलू कलाकार शुभम सावंत याने सरांचे काढलेले तैलचित्र भेट म्हणून दिले.
यावेळी विश्वनाथ राऊळ यांनी आजपर्यंतच्या आपल्या शैक्षणिक कार्यात कुटुंबीयांसह संस्था सहकारी शिक्षक ग्रामस्थ माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्यामुळेच आपण हायस्कूलच्या विकासासाठी योगदान देऊ शकल्याचे सांगताना शाळेशी जुळलेले ऋणानुबंध यापुढेही कायम राहतील याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचा निरोप घेताना मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ सर व विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश सांगेलकर यांनी सूत्रसंचालन भरत गावडे यांनी तर आभार हनुमंत नाईक यांनी मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

