🟥 साटेली भेडशी ग्रामपंचायतीचे सरपंच लखु खरवत यांच्या विरोधात उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी दाखल केला अविश्वास ठराव..
*🟥 तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साटेली तर्फ भेडशी ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच अविश्वास ठराव..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-३०:-* दोडामार्ग तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या साटेली भेडशी ग्रामपंचायतीचे सरपंच लखु खरवत यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी घेतला असून याबाबत तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याकडे नोटीसीद्वारे दिला आहे.
साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या पहिल्याच थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत लखु खरवत हे विजयी झाले होते.थेट सरपंच म्हणून निवडून येणारे ते पहिले सरपंच ठरले.दरम्यान आता त्यांच्याच सहकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठरवाचा पवित्रा घेतला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या अर्जात सदस्यांना विश्वासात न घेणे,मनमानी कारभार करणे,ग्रामपंचायत कामात गैरव्यवहार,ग्राम कमिट्यांच्या सभा न बोलावणे,कर्तव्यात कसूर करून कामात जाणूनबुजून चालढकल करणे,ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित न राहणे ही कारणे नमूद करण्यात आली आहे.
या ठराव अर्जावर ११ सदस्यांपैकी नामदेव फटी धरणे,सौ.सुजाता तुळशीदास नाईक,उपसरपंच गणपत ज्ञानेश्वर डांगी,रामचंद्र पांडुरंग भिसे,प्रकाश वासू कदम,सूर्यकांत दत्ताराम धर्णे,सौ.प्रमिला प्रकाश धर्णे,सौ.लक्ष्मी नारायण धर्णे,सौ.शोभना किशोर जुवेकर,सौ.जेनिफर मार्शल लोबो या १० सदस्यांच्या सह्या आहेत.एक सदस्य बाहेरगावी असल्याने त्याची सही होऊ शकलेली नाही.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साटेली तर्फ भेडशी ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे.
दरम्यान याबाबतची सुनावणी ६ किंवा ७ ऑक्टोबरला होणार असून शासनाच्या निर्देशानुसार त्यानंतर १५ दिवसांनी ग्रामसभा होऊन याबाबतचा निर्णय होणार आहे.
सद्यस्थितीत सर्वच सदस्य सरपंच लखु खरवत यांच्या विरोधात गेल्यामुळे आता सरपंच खरवत कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

