कोकण

दोन वेगवेगळ्या अपघातात तब्बल ८ जण जखमी

सावंतवाडी, ता. २५: आकेरी व दाणोली येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तब्ब्ल आठ जण जखमी झाले आहेत. मात्र त्या जखमींना एकाच वेळी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे वैदयकीय अधिकाऱ्यांची धावपळ झाली. यातील एक अपघात हा आकेरी तिठा येथे दोन दुचाकीत घडला आहे. पादचारी महिलेला बाजू देताना हा अपघात घडल्याचे संबधितांचे म्हणणे आहे. तर दुसरा अपघात दाणोली येथे दुचाकी व व्हॅगनर कार यांच्यात घडला. या अपघातात तीघे जखमी झाले आहेत. शंकर आत्मारात राउळ (३०) रा. शिरशिंगे, निलेश एकनाथ सावंत (३२) रा.शिरशिंगे, संदेश सत्यवान नाईक (२९) रा. झाराप, पार्वती व्यकप्पा गाडेकर (५२), अनंत सिताराम चव्हाण (४०) अशी आकेरी येथील अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यातील तिघांना अधिक उपचारासाठी गोवा- बांबूळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!