सहोदया कॉम्प्लेक्स कोल्हापूर तर्फे इयत्ता दहावीत भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रथम आलेल्या वेदिका परब व उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्राची कुडतरकर यांचा सन्मान
*सहोदया कॉम्प्लेक्स कोल्हापूर तर्फे इयत्ता दहावीत भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रथम आलेल्या वेदिका परब व उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्राची कुडतरकर यांचा सन्मान*
सावंतवाडी
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या शंभर टक्के निकालाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील प्रथम आलेल्या कुमारी वेदिका परब तसेच यावर्षीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेच्या शिक्षिका श्रीमती प्राची कुडतरकर यांचा सहोदया कॉम्प्लेक्स कोल्हापूर आयोजित संजीवन ग्रुप ऑफ स्कूल पन्हाळा कोल्हापूर येथे गुणगौरव करण्यात आला.
सहोदया कॉम्प्लेक्स कोल्हापूर मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, तसेच सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये एकूण सीबीएसई बोर्डच्या एकूण48 शाळांच्या उत्कृष्ट विद्यार्थी तसेच शिक्षक व मुख्याध्यापक यांचा शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील उत्कृष्ट कामगिरी बद्दल गौरव करण्यात आला.
सहोदया कॉम्प्लेक्स स्थापनेचा उद्देश्य सर्वांनी एकत्रितपणे उदयास येणे व शैक्षणिक प्रक्रिया पद्धतशीरपणे चालविणे हा आहे. शैक्षणिक व्यवस्थापन, मूल्यमापन, मानव संसाधन एकत्रीकरण, शिक्षकांची व्यवसायिक वाढ, शिक्षक प्रशिक्षण, मूल्याभिमुख शालेय वातावरण ही सहोदया कॉम्प्लेक्स ची ध्येये आहेत. येथे वेळोवेळी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या विषयाबद्दल त्यांना मार्गदर्शन केले जाते तसेच बदलते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा विचार करून शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते.
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये यावर्षी इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेल्या कुमारी वेदिका परब हिचा गौरव करण्यात आला तसेच शाळेच्या शिक्षिका श्रीमती प्राची कुडतरकर यांच्या यावर्षीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. या सर्वांमध्ये या शैक्षणिक वर्षाच्या उत्कृष्ट यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री वेंकटेश बक्षी सर यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे प्रेसिडेंट माननीय श्री. पी. आर. भोसले सर, सहोदया
कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या प्रेसिडेंट तसेच संजय घोडावत स्कूलच्या प्रिन्सिपल माननीय श्रीमती सस्मिता मोहंती मॅडम तसेच डॉक्टर हिरालाल निरंकारी यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथील एकूण सीबीएसई बोर्डच्या 48 शाळांतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते. कार्यक्रम संजीवन ग्रुप ऑफ स्कूल पन्हाळा ,कोल्हापूर येथे पार पडला.
यशवंतराव भोसले स्कूलचे संस्थापक माननीय श्री अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा माननीय श्रीमती अस्मिता सावंत भोसले, सचिव माननीय श्री संजीव देसाई तसेच संस्थेच्या व्यवस्थापकीय समन्वयक माननीय श्रीमती सुमित्रा फाटक मॅडम यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले व शाळेच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.