कोकणमहाराष्ट्रराजकीय

जिल्ह्याची ओळख देणारे बांदा येथे प्रवेशव्दार उभे करावे-शालेय शिक्षण मंत्रीदिपक केसरकर

*🟥जिल्ह्याची ओळख देणारे बांदा येथे प्रवेशव्दार उभे करावे-शालेय शिक्षण मंत्रीदिपक केसरकर*

*🟥आरटीओ, पोलीस आणि एक्साईज यांची तपासणी एकाच ठिकाणी व्हावी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि३सप्टेंबर.:*
जिल्ह्याची ओळख व्हावी या दृष्टीने बांदा येथे प्रवेशव्दार उभे करावे. चांगल्या सुविधा रेस्टॉरंट, बगीचा उभे करतानांच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी परिवहन विभाग, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांनी सीमा तपासणी नाक्यावर एकाच ठिकाणी करावी, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.श्री. केसरकर यांनी बांदा येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावरील सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीला यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सहायक वनसंरक्षक वर्षा खरमाटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, क्षेत्रिय वन अधिकारी विद्या घोडके, तहसिलदार श्रीधर पाटील, सरपंच आक्रम खान उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग ॲथोरेटीने एमटीडीसीच्या विभागाबरोबर उद्याच जागेची पाहणी करावी. या प्रवेशव्दारावर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा उभाराव्यात. या ठिकाणी माहिती पत्रके वाटण्यासाठी माहिती केंद्र उभे करावेत. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती एलईडी स्क्रीनवर दर्शवावी. सीमा तपासणी नाक्यावर परिवहन विभाग, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांनी एकाच ठिकाणी करावी. त्या वाहनांची जिल्ह्यात कोठेही पुन्हा तपासणी होणार नाही. असे स्टीकर लावावे.
बांदा येथील किल्ला पर्यटनासाठी खुला करुन बांदा पर्यटन नकाशावर येईल त्या दृष्टीने नियोजन करावेत. वन विभागाने आंबोली येथे येणाऱ्या पर्यटकांनासाठी पार्किंगची व्यवस्था करावी. पार्किंग पासून धबधब्यापर्यंत पर्यटकांना सोडण्यासाठी बॅटरीवरील वाहनांची सोय करावी. यासाठी माजी सैनिक तरुण वर्गाचे सहकार्य घ्यावे. आंबोली येथील चारही धबधब्यांची पर्यटकांसाठी साखळी करावी. कावळेसादला पोलीस चौकी बांधावी. अशी सूचनाही त्यांनी केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!