निवृत्त सैनिक सोनू मार्गी यांचा जन्मभूमीत जाहीर सत्कार
निवृत्त सैनिक सोनू मार्गी यांचा जन्मभूमीत जाहीर सत्कार ..
भावई ग्रुप गोठोस मंडळाच्या वतीने करण्यात आला सत्कार.
माणगाव प्रतिनिधी :- सद्गुरू घावनळकर
.lसिंधुदुर्ग जिल्ह्यातिल कुडाळ तालुक्यातील सह्याद्री च्या कुशीत वसलेल्या गोठोस गावचे सुपुत्र सोनू मधुकर मार्गी यांनी 17 वर्ष देशसेवा करून स्वगृही परतले .मित्र परिवार आणि आप्तेष्ट यांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या .या प्रसंगी लहान पानापासून एकाच एकत्र खेळले बागडलेले मित्र परिवार आवर्जून उपस्थित होते .कोकणतल्या दुर्मिळ अशा खेड्या पाड्यातून अनेक मूल सैन्यदलात सहभागी होत असतात ,त्यातील एक सोनू मार्गी .
लहान पणापासून च कला क्रीडा क्षेत्रात पारंगत असणारे सोनू मार्गी हे त्यांच्या घरातील तिसरे सैनिक आहेत त्या अगोदर त्यांचे काका ,वडील आणि आता सोनू यांनी देशसेवा करून गावच आणि आपलं नाव कर्तृत्व वाण सैनिकांच्या यादीत नमूद केलं आहे . यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले.