कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आरोंदा पतसंस्थेतर्फे माजी सैनिकांचा सत्कार..

*🟥 आरोंदा प्राथमिक शाळा नं १ च्या विद्यार्थ्यांना सुपारीची रोपटी वाटप..*

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२९:-* भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आरोंदा पंचक्रोशी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने आरोंदा पंचक्रोशी परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.आरोंदा पंचक्रोशी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना संस्थेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात साजरे करत असताना संस्थेचाही यामध्ये सहभाग असावा, या उद्देशाने संचालक मंडळाने आरोंदा पंचक्रोशीतील माजी सैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या सीमेवर अविरतपणे जागता पहारा देत देशाची सेवा करतानाच आपले संरक्षण करण्याऱ्या सैनिकांप्रती आदरभाव व ऋण व्यक्त करणे सर्वांचेच कर्तव्य बनते.त्यादृष्टीने माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ व सुपारीचे रोप प्रदान करून सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी सैनिक रामदास कांबळी, बाबुराव नाईबागकर, शांताराम जाधव, विश्राम बा. नाईक, अनंत य. नाईक, प्रशांत नाईक, अरुण परब यांचा समावेश आहे. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन महादेव बुडे, व्हा. चेअरमन ज्योती पेंडसे, संचालक दिगंबर सौदागर, राधाकृष्ण गडेकर, उत्तम नाईक, मंगेश पराडकर, रावजी गावडे, पंकज तळवणेकर, व्यवस्थापक हनुमंत कुबल, लिपिक ममता मातोंडकर, सभासद विद्याधर नाईक आदी उपस्थित होते.

याशिवाय आरोंदा प्राथमिक शाळा नं १च्या विद्यार्थ्यांना सुपारीची रोपटी प्रदान केली.

यावेळी निवृत्त शिक्षक बाळा आरोंदेकर, शिवाजी जाधव, आदींसह शाळेतील शिक्षक व पालक उपस्थित होते. विशेष उपक्रमा अंतर्गत आरोंदा पंचक्रोशीतील गरीब कुटुंबातील तीन अपंग व्यक्तींना त्यांचा घरी जाऊन अल्पशी आर्थिक मदत प्रदान केली. यामध्ये अर्जुन सुरेश रेडकर आरोंदा, महेश गणपत नाईक, आरोंदा, पुंडलिक घोगळे, गुळदुवे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या संस्थेच्या स्थापनेपासून जडणघडणीत यापूर्वी आपले नि:स्वार्थीपणे योगदान दिलेल्या माजी संचालकांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू प्रदान करून सन्मान करण्यात आला.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!