कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसिंधुदुर्ग

अनियमित वीजपुरवठ्या बाबत भाजपा विज अधिकारयांना जाब विचारणार- प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 वेंगुर्ले , दि२१ऑगस्ट.*
वेंगुर्ले शहराबरोबर तालुक्यामध्ये काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबर कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो . याबाबत विज अधिकारयांना जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११: ०० वाजता भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विज वितरण कार्यालयावर धडक देणार असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .
सद्ध्या सणासुदीचा काळ सुरू असुन , येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होणार आहे . परंतु सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गणेशोत्सवापुर्वी करण्यात येणारया कामांचा खेळखंडोबा होत आहे .त्याचप्रमाणे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गृहीणी तसेच व्यापारी वर्गाला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने गणेश मुर्तीकारांच्या कामावर परीणाम होत आहे . गणेश चतुर्थी एक आठवड्यावर आल्यामुळे मुर्तीकारांची लगबग सुरू आहे , परंतु सातत्याने विज प्रवाह खंडित होत असल्यामुळे मुर्तीकारांना काम करणे कठीण बनले आहे .
तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे तसेच अति उच्च दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गेल्या महीन्या भरात अनेकांचे इनर्व्हटर , पंखे तसेच दुरदर्शन संच जळाल्याच्या घटना घडल्या आहेत .
याबाबत विज वितरण विभागास जाब विचारण्यासाठी भाजपा वेंगुर्ले चे कार्यकर्ते , सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११: ०० वाजता अधिकारयांना भेटणार आहेत , तरी समस्त वेंगुर्ले वासीयांनी यावेळी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*

_*👨🏻‍🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_

महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻‍🍳👨🏻‍🍳🧑🏻‍🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!