विविध कार्यक्रमानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहाची सांगता.
विविध कार्यक्रमानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहाची सांगता.
सावंतवाडी प्रतिनिधी: निगुडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ भव्य पटांगणावर ठीक ११:०० वाजता सामूहिक राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच गावातील अनेक वाड्यांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशे गजरात मोठ्या संख्येने ग्रामपंचायतच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली सदर प्रभात फेरीला बांदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक श्री शामराव काळे यांनी आपल्या सहकार्यासमवेत भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले आपण काढलेल्या या स्वतंत्र अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाला आपल्या शुभेच्छा व मार्गदर्शन केलं त्यानंतर श्री देवी माऊली मंदिरात विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद निगुडे शाळा नंबर १ चे सहशिक्षक श्री होंडे यांनी केले विद्यार्थ्यांनी स्वतंत्र्यातील आदर्शवत नेताजी सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत अभिनय सादर केले निगुडे उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे, ग्रामपंचायत सदस्य ईशा तुळसकर, प्रताप गावडे, लक्ष्मी दळवी, समीक्षा गावडे, ग्रामसेवक तनवी गवस, तलाठी भाग्यश्री शिंदे, जिल्हा परिषदेचे शिक्षक श्रीमती कोलते, श्री कुसाजी मेस्त्री, अंगणवाडी सेविका प्रियंका राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर, पोलीस पाटील सुचिता मयेकर, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर, सीआरपी संजना केसरकर, रोहिणी गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेहा पोखरे, पूर्णिमा गावडे, आरोग्य सेवक निळकंठ बांदवलकर, तसेच महिला शुभांगी गावडे, लक्ष्मी पोखरेे, ममता गावडे, गंधाली निगुडकर, जानवी जाधव, कविता गावडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव, पुरुषोत्तम गावडे, वसंत जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष राणे, लहू जाधव, परेश गावडे, सुचिता मयेकर आदी उपस्थित होते

