आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

मुंबई गोवा महामार्गावर पीठढवळ पुलानजीक अपघात

*मुंबई गोवा महामार्गावर पीठढवळ पुलानजीक अपघात*

*एकाच कुटुंबातील सात जन जखमी तर महिला ठार*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

मुंबई गोवा महामार्गावर ओरोस पिटढवळ पुलांचे नजीक फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाला. अपघातात गाडीतील सात जण जखमी झाले. यांना गोवाबांबुळी येथे हलविण्यात आले हे सर्वजण कुडाळवरून कासार्डे येथे जात होते .राजस्थान वरून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. महामार्गावरील साठलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येते .व ओरोस पिटढवळ पुलाच्या पुढे महामार्गावरील कणकवलीच्या दिशेने जाताना गादी विक्री दुकान नजिक अपघात झाला चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने साईडच्या कटड्याला आपटल्याने अपघात झाला यात राजू देवीनरपत कुमार माली ३० ही महिला अपघातात ठार झाली तर गाडीतील सात जखमी झाले पोलिसांनी जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले व अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. जखमी मध्ये असलाराम माली ३० अनिल असलाराम राम माली ५ स्वरूप नरपत कुमार माली ५ नलित असलाराम माली ७ वर्षा नरपत कुमार माली ९ भावेश असलाराम माली १० विमला असलाराम माली २५ यांचा समावेश आहे हे सर्वजण कुडाळवरून कासार्डे येथे जात होते. राजस्थान वरून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले अपघातातील सर्व एकाच कुटुंबातील होती अशी माहिती पोलिसांनी दिली अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत देवरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!