आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

खेमराज महाविद्यालया व मदर क्वीन हायस्कूल समोरील रस्त्यावर एकत्र आलेल्या विद्यूत तारांपासून विद्यार्थी व पालकवर्गाच्या जिवितास धोका

*🟥 पंचम खेमराज महाविद्यालया व मदर क्वीन हायस्कूल समोरील रस्त्यावर एकत्र आलेल्या विद्यूत तारांपासून विद्यार्थी व पालकवर्गाच्या जिवितास धोका*

*🟥 अनेक वेळा विद्यूत कार्यालयाला कळवूनही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी सुशेगाद*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी दि-१०:-ऑगस्ट*
सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयातमोरील मदर क्वीन हायस्कूल समोरील विद्युत तारणा घातलेले संरक्षक तारा एकत्र आल्याने व तारांच्या वर भलीमोठी झाडे उभी असल्याने रस्त्यावर उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे याबाबत विद्युत कंपनीच्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्यांनी दखल न घेतल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मदर क्वीन इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलांना पालक सोडण्यासाठी व नेण्यासाठी येतात ,यावेळी ते मदर क्वीन स्कूलच्या समोरील रस्त्यावर फुटपाथ वर उभे असतात.
ज्या ठिकाणी विद्यार्थी पालक उभे राहतात त्यांच्याच डोक्यावर विद्युतदारांचे जाळे असून वर भली मोठी झाडे उभे आहेत, वाऱ्याच्या वेळी एखादी फांदी तुटून विद्युत तारांवर पडली तर पालकांच्या, मुलांच्या जीवनात धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून त्या विद्यूत तारांना संरक्षण तारा खालून लावण्यात आल्या होत्या मात्र त्या तारा सर्व एकत्र झाल्याने पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
याबाबत काही पालकांनी विद्युत वितरण कार्यालयाला कळूनही त्यांनी कोणतीही दात दिली नाही, खरे तर गेंड्याच्या कातडीच्या अशा अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी नागरिकांनी जागृत होणे गरजेचे आहे . याबाबत येत्या चार दिवसात उचित कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेरावा घालून जाब विचारण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!