मालवण कसाल मार्गावर कुपेरीचे घाटीत भीषण अपघात ट्रकची आंब्याच्या झाडाला धडक तर चालकाचा जागीच मृत्यू
*मालवण कसाल मार्गावर कुपेरीचे घाटीत भीषण अपघात ट्रकची आंब्याच्या झाडाला धडक तर चालकाचा जागीच मृत्यू*
*क्लीनर गंभीर जखमी*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
मालवण चौकेतून कर्नाटक येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक मालवण कसाल मार्गावर चौके कुपेरीची घाटी उतारावर भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाला धडकून भीषण अपघात झाला ही घटना मंगळवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडली अपघातात ट्रक चालक अर्जुन ईश्वर नायकप्पागोल वय 30 नायकर ओणी यरगणवी तालुका सौंदत्ती बेळगाव याचा जागी मृत्यू झाला समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात ट्रक वरील ताबा सुटल्याने अपघात झाला अपघातानंतर चालकाचा मृतदेह बराच वेळ केबिनमध्ये मध्ये अडकून होता त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते क्लीनरने ट्रक मधून उडी मारल्याने त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली मंगळवारी झालेल्या या भीषण अपघातात मार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती अधिक माहिती मिळतात ग्रामस्थांनी या ठिकाणी नाव घेतली अधिक उपचारासाठी क्लिनरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मालवण पोलीस निरीक्षक विजयकुमार यादव व कट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते . ट्रकचे केबिनमध्ये अडकलेला मृत्यूदेह बाहेर काढण्यात आला अधिक तपास मालवण पोलीस करीत आहेत.

