कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

न्हावेली येथील रास्त दुकानात चुकीच्या पद्धतीने धान्य वितरण

न्हावेली येथील रास्त दुकानात चुकीच्या पद्धतीने धान्य वितरण!

न्हावेली ग्रामस्थांची तहसीलदार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे दुकाधदारावर कारवाई करण्याची मागणी

सावंतवाडी (सुखदेव राऊळ )

न्हावेली येथील रास्त धान्य दुकानात धान्य वितरणात चुकीचे वाटप होत आहे.यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. वर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करा, अशी मागणी रविवारी न्हावेली ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शैलेश भगत, महादेव चौकेकर,अंकित धाऊसकर आदी उ पस्थित होते. या निवेदनात म्हटले की, न्हावेली येथील धान्य दुकानामधून गेली कित्येक वर्षे कार्यालयीन वेळेनुसार धान्य वितरीत केले जात नाही. प्रत्येक महिना धान्याची मागणी केली असता धान्य साठा संपलेला आहे, असे सांगितले जाते. तसेच ऑनलाईन मशिनला अंगठा लागत नाही, नेटवर्क प्रॉब्लेम, लाईट नाही अशी कारणे धान्य दुकानदाराकडून दिली जातात. दर महिन्याच्या 25 तारखेला धान्यदुकान उघडले जाते व त्यानंतर धान्य विक्री होते. धान्यदुकान पुर्णवेळ चालू नसते. तसेच प्रत्येक महिन्याला वितरीत धान्य, शिल्लक धान्य तसेच शिल्लक साठा असा बोर्ड देखील लावलेला नसतो. तसेच दक्षता कमिटीचा देखील अद्यापपर्यंत बोर्ड लावण्यात येत नाही. अशा अनेक समस्या गेली.कित्येक वर्षे न्हावेली ग्रामस्थांना भेडसावत आहेत. चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या या धान्य वितरणाबाबत योग्य ती कार्यवाही करून उपाययोजना करावी, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ग्रामस्थांना उपोषण करावे लागेल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!