बोर्डवे येथे रेल्वे रुळाच्या बाजूला आढळला मृतदेह
*बोर्डवे येथे रेल्वे रुळाच्या बाजूला आढळला मृतदेह*
*रेल्वे प्रवासादरम्यान झाली होती बेपत्ता*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडीने वडिलांसोबत 3 ऑगस्ट रोजी प्रवास करतेवेळी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास वैजयंती दत्ताराम सावंत वय वर्षे 25 तेर्सेबांबर्डे कुडाळ हि युवती गाडी कणकवली रेल्वे स्टेशन येथे आली असता तिच्या वडिलांना ती गाडीत आढळून आली नाही त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी 7 सुमारास बोर्डवे अपराजवाडी येथे रेल्वे रुळाच्या बाजूला झाडीमध्ये तीचा मृतदेह आढळून आला ही युवती रेल्वेतून पडली की अन्य काही कारण याची अधिक माहिती मिळू शकली नाही त्यानंतर मयत युवतीच्या वडिलांनी व कणकवली पोलिसांनी पाहणी केल्यानंतर हा मृतदेह वैजयंती हिचा असेलच सांगितले याप्रकरणी कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

