भाजपच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या टीकेला तूर्तास उत्तर देऊ नये- समीर नलावडे
भाजपच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या टीकेला तूर्तास उत्तर देऊ नये- समीर नलावडे
★ कणकवली दि०५ : राज्यात भाजपा व शिवसेना शिंदे गट हे एकत्र येत स्थापन झालेले सरकार हे हिंदुत्व च्या मुद्दयावर एकत्र आले आहेत. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी चे आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. मात्र भाजपाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या टीकेला तूर्तास उत्तर देऊ नये. याबाबत योग्य वेळी योग्य तो पक्षाकडून निर्णय घेतला जाईल अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

