सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक असताना वचक बसवू न शकणारे तडवी उपायुक्त होऊन काय दिवे लावणार.
सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक असताना वचक बसवू न शकणारे तडवी उपायुक्त होऊन काय दिवे लावणार.
तडवींच्या काळात गोव्यातून सिंधुदुर्गात येणार्या अवैद्य दारू धंद्या विरोधात कोकण लाईव्ह ला उठवावा लागला आवाज
ओरोस, दि.०५ : येथील उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांची उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त पदावर पदोन्नती झाली.सिंधुदुर्गाचे अधिक्षक असताना या कोट्यवधी रुपयांची अवैध दारू गोवा राज्यातून सिंधुदुर्ग व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात पुरवठा होत होती यावर कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने आवाज उठविला नंतर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप खडबडून जागे झाले व कारवाउ होण्यास सुरुवात झाली.ते तडवी आता उत्पादन शुल्काचे उपायुक्त होऊन काय दिवे लावणार अशा प्रतिक्रिया जनमानसातून व्यक्त होत आहेत.
तत्कालीन विभागीय उपायुक्तांच्या निवृत्तीनंतर कोल्हापूर विभागीय उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सध्या डॉ वी यांच्याकडे आहे.
कालच त्यांची विभागीय उपायुक्त पदावर पदोन्नती झाल्याने विटा निरीक्षक विजय ओमनाळे, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, सिंधुदुर्ग चे निरीक्षक अमित पाडळकर, निरीक्षक संजय दळवी, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, राहूल मोरे, विशाल सरवटे यांनी पुष्पगुच्छ देवून तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘लोकराज्य’ देवून डॉ. तडवी यांचे अभिनंदन करण्यात आले.हे सर्व खरे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्पादन शुल्क अधिकारी असताना अवैध दारू धंद्या विरोधात आपला वचक बसवू शकले नाहीत ते पदोन्नती मिळून काय दिवे लावणार असे बोलले जात आहे.

