🟥 नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीस
*🟥 शासन स्तरावर सर्वे होणे आवश्यक*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रकाश झोत : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०४:-* शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतीबरोबरच आंबा काजू कोकम हे कोकणातील सर्वसामान्य जनतेचे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. परंतु मागील काही वर्षात व सध्याच्या कालावधीत उद्भवत असलेली नैसर्गिक आपत्तींची स्थिती पाहता सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याबाबत शासन स्तरावरून मुख्यतः गोरगरीब शेतकरी यांचा सर्वे करून यांना योग्य असे आर्थिक पाठबळ पुरवणे आवश्यक आहे .तसेच पेन्शन योजना सुरू करणे आवश्यक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे गवारड्यांचा वावर सर्व तालुक्यात आहे बऱ्याच ठिकाणी
गवारेडयांनी शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले आहे. गवारेडयांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामध्ये शेतामधील भात शेती ,चवळी, मका, कुळीद , पीक वाली या पिकांचे तसेच काही ठिकाणी केळी माड बागायती नुकसान केले आहे. त्यामुळे उन्हात व पावसाळ्यात अपार कष्ट करून घेतलेली पिके गवारड्यांकडून वनगाईंकडून तसेच हत्तींकडून उध्वस्त होत असतील तर काय उपयोग याबाबतीत मिळणारी नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. शिवाय कागदोपत्री अडचणी आहेतच सुमारे दहा-बारा गवारड्यांचा कळप शेतीचे नुकसान करीत आहे .याबाबत वनविभागाकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे .तसेच गेल्या काही वर्षात विविध प्रकारची चक्रीवादळे बदललेले हवामान अवकाळी पाऊस त्यामुळे भात पीक करणारे शेतकरी आंबा काजू बागायतदार शेतकरी मेटाकुटीस आले आहेत यातच यंदा आंबा काजू व अन्य पिकांचे अल्प उत्पादन यामुळे सर्वांनाच आर्थिक नुकसानी सामोरे जावे लागत आहे. यामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास नुकसान भरपाई त्वरित मिळणे आवश्यक आहे. आगीमुळे होणाऱ्या नुकसानी बाबत ठोस उपाययोजना हवी शॉर्टसर्किट, वनवे व अन्य गोष्टींमुळे आंबा काजू बागायतीने आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते कलम लागवडीनंतर योग्य वाढीपर्यंत यांची जोपासना करण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत घेतात. अशी झाडे व बागायती जर मोठी झाल्यावर उत्पन्न देणारी झाल्यावर याच आग लागून नुकसानी झाल्यास शेतकऱ्यांची मेहनत वाया जाते व आर्थिक नुकसानही सोसावे लागते मिळणारी नुकसान भरपाई वेळेत मिळत नसल्याने आणखीच विविध अडचणींना सामना करावा लागतो याशिवाय कागदोपत्री अडचणी आहेतच. याबाबत संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे .शासन स्तरावरून शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरविल्या जातात .नवीन तंत्रज्ञाच्या आधारे शेतीत मोठा बदल झाला आहे. मागील चार वर्षापासून शासनाने पीएम किसान योजना सुरू करून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा दिला आहे. शेतकरी अपघात विमा योजना अमलात आणल्याने याचाही फायदा झाला आहे. परंतु अन्य उत्पादनाचे साधन नसल्याने व ज्या शेतकऱ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फक्त शेतीमध्येच खर्ची घातली आहे .अशा शेतकऱ्यांना शासनाने पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

