आंबोली सैनिक स्कूलमध्ये नवीन वर्षा करिता प्रवेश प्रक्रिया सुरू….
आंबोली सैनिक स्कूलमध्ये नवीन वर्षा करिता प्रवेश प्रक्रिया सुरू….
६ वी ते ९ वी व १२ वी सायन्स वर्ग; प्रवेश नोंदविण्याचे संस्थेचे आवाहन…
| सावंतवाडी, दि ३१ : आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमध्ये इयत्ता ६ वी ते ९ वी व १२ वी सायन्स शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२२-२३ या वर्षा करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तरी जास्तीत-जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश नोंदवावा, असे आवाहन सैनिक स्कूल संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या सैनिक स्कूलच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिक शिक्षण दिले जात आहे. या प्रशालेची इमारत सुरक्षित स्थळी व निसर्गरम्य वातावरणात आहे. तर परिसरात भव्य क्रीडा पटांगण आहे. तसेच आधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष व ग्रंथालयाची सुविधा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर उच्चशिक्षित शिक्षक व प्रशिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण याठिकाणी दिले जात आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निवासी वैद्यकीय अधिकारी त्याठिकाणी नेमण्यात आले आहेत. तसेच करिअर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, एनडीए, जेईई, नीट, एमएचटी-सीईटी आदी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी २०२२-२३ या वर्षासाठी ६ वी ते ९ वी १२ वी सायन्स शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, प्रवेश घ्यावा, असे आवाहन सैनिक स्कूल संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

