कोकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय

खरी शिवसेना कुणाची ? ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा ! निवडणूक आयोगाचे ठाकरे – शिंदे गटाला निर्देश

*🟥खरी शिवसेना कुणाची ? ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा ! निवडणूक आयोगाचे ठाकरे – शिंदे गटाला निर्देश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे*

*🎴 मुंबई, दि.:२४ जुलै*
खरी शिवसेना कुणाची ८ आगस्टपर्यंत पुरावे सादर करा असे निर्देश आता भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना दिले आहेत. महाराष्ट्रातलं
महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोसळलं. कारण शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झालं आहे. आता शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेही यांनीही शिवसेना आमचीच म्हणणारे लोक जे आहेत त्यांना भुलू नका म्हटलंय. आदित्य ठाकरे यांनीही शिव संवाद यात्रा काढली आहे. आता शिवसेना नेमकी कुणाची ते सिद्ध करा हे निवडणूक आयोगाने
म्हटलंय.
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात
शिवसेना आमचीच असं एकनाथ शिंदे गटाने म्हटलं आहे. तसंच शिवसेनेतल्या १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाला पत्र देऊन आमचं म्हणणं ऐकून घेण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून खरी शिवसेना आम्ही असून आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळावं असं म्हटलं आहे.
आता निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत आवश्यक ती कागदपत्रं जमा करा असं म्हटलं आहे. ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे. आता शिवसेनेत जी भली मोठी फूट पडली आहे त्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेतल्या ठाकरे विरूद्ध शिंदे गटाची लढाई सुप्रीम कोर्टातही गेली आहे. १ ऑगस्टला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर खंडपीठाकडून सुनावणी होणार आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आमचीच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याला भुलू नका असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती. बंडानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटावर कारवाई करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावरही शिंदे गटाकडून हक्क सांगण्यात आला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

🔍 *www.mitm.ac.in*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!