कणकवली महाविद्यालयाचा तृतीय वर्ष कला शाखेचा निकाल १०० टक्के..
▪️वाणिज्य शाखे पाठोपाठ कला शाखेतही उज्वल यशाची परंपरा कायम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴 कणकवली,दि.०१: मुंबई विद्यापीठ अंतर्गत झालेल्या तृतीय वर्ष कला शाखेचा निकाल विद्यापीठाने जाहीर केला आहे. वाणिज्य शाखे पाठोपाठ कला शाखेतही कणकवली महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून यंदा कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यंदा कणकवली महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी कला शाखेची परिक्षा दिली होती. त्यापैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उर्वरित १० विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने राखीव ठेवला आहे. प्रथम क्रमांक – बंदिनी गजानन परब, द्वितीय क्रमांक – प्रणाली संतोष दळवी आणि तृतीय क्रमांक – सायली प्रकाश तांबे ह्या विद्यार्थिनी आहेत. कणकवली कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी कला शाखेत १०० टक्के यश संपादन केल्याबद्दल कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, चेअरमन पी.डी. कामत, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले व सर्व शिक्षक शिक्षकेतर-कर्मचारी या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

