मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात होण्यासाठी शासनाचे सर्वेतोपरी प्रयत्न; मंत्री अब्दुल सत्तार
▪️राजघराण्याशी चर्चा सुरू असून सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०१: मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात होण्यासाठी शासन सर्वेतोपरी प्रयत्न करेल त्यासाठी राजघराण्याशी चर्चा सुरू असून त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, असे असा विश्वास महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी संस्थानचे राजघराने यांच्याशी चर्चा आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील नियोजित मल्टीस्पेशलिटी ची जागा पाहणी केल्यानंतर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे म्हणून आम्ही जमीन देण्यास तयार आहोत. मात्र, प्रस्ताव दिल्याप्रमाणे योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी केली.
सावंतवाडी येथे होणार्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जागा देण्याबाबत राजघराणे आणि महसुल राज्यमंत्री अब्दुुल सत्तार यांच्यात आज चर्चा झाली. यावेळी आम्ही जागा देण्यास तयार आहोत. मात्र, योग्य तो मोबदला आम्हाला द्या, अशी मागणी श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी केली. त्यानुसार आवश्यक ती चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन श्री. सत्तार यांनी दिले.
राजवाड्यात भेटी दरम्यान प्रथम गंजिफाची पाहणी केली आणि माहिती घेतली. यावेळी सावंतवाडीच्या प्रसिध्द लाकडी खेळणी गंजिफासह शहराच्या पर्यटन विकासासाठी योग्य तो प्रयत्न करावा, अशी मागणी सौ. शुभदादेवी भोसले यांनी यावेळी केली.
यावेळी माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर, जेष्ठ कार्यकर्ते अण्णा केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, शब्बीर मणीयार, गुणाजी गावडे,योगेश नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी राजघराणे, उपस्थित मंत्री आणि प्रशासनाशी चर्चा झाली. यावेळी श्रीमंत खेम सावंत भोसले म्हणाले, आमच्या म्हणण्याबाबतचा प्रस्ताव आपण जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. त्यानुसार आपल्याला भरपाई देण्यात यावी.
राजघराणे आणि शासन भुमिका यावर चर्चा झाली. यावेळी आमदार केसरकर यांनी उपजिल्हा रुग्णालय आहे, त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विलंब लागणार नाही. तसेच लोकांची मागणी असल्यामुळे या ठीकाणी लवकरात लवकर हॉस्पिटल होणे गरजेचे आहे.त्यामुळे राजघराण्याने सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी विनंती केली. त्यानुसार याबाबत लवकरच निर्णय घ्यावा, आवश्यक असल्यास पुन्हा एकदा चर्चा करावी आणि लोकांच्या सोईसाठी लवकरात लवकर ही जागा उपलब्ध करुन देण्यासाठी राजघराण्याने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी श्री. सत्तार यांनी केली.
सावंतवाडी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चा जमिनीचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा म्हणून शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळेच राजघराण्याशी आपण आज चर्चा केली. अजूनही याबाबत जरूर ती चर्चा करून शासन पातळीवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार दिपक केसरकर यांनी बोलताना दिली.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_