आमदार दीपक केसरकर यांनी हवेततून खाली उतरावे-बबन साळगावकर
*🟥. आमदार दीपक केसरकर यांनी हवेततून खाली उतरावे-बबन साळगावकर*
*🟥शरद पवार यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्यास पूर्व इतिहास काढावा लागेल*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 सावंतवाडी, दि.:१४ जुलै*
इकडे तिकडे मारणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांनी आमदार दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर बोलताना सबुरी घ्यावी, अन्यथा तुमच्या राजकारणाचा इतिहास तुमच्या एवढा कोणाला माहिती नसेल तो काढावा लागेल असा इशारा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व केसरकर यांचे एका काळाचे खंदे समर्थक बबन साळगावकर यांनी दिला आहे.
प्रवक्ते झालात म्हणून तुम्ही पवारांची उंची गाठू शकणार नाही. फार बोललात ते आता बस करा,आणि हवेतून जमिनीवर या असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. आमदार दीपक केसरकर यांचे एके काळचे खंदे समर्थक म्हणून • ओळखल्या जाणाऱ्या श्री. साळगावकर यांनी केसरकरांना शरद पवारांवर टीका केल्यानंतर अशी प्रतिक्रिया दिली आहे.
साळगावकर म्हणाले की, शरद पवार यांच्यावर बोलताना केसरकर यांनी सबुरीने बोलावे. आज प्रवक्ते झालात म्हणून पवारांन एवढी उंची तुम्हाला गाठता येणार नाही. कै. यशवंतराव चव्हाण त्यानंतर कै. शंकरराव चव्हाण, एस. एम. जोशी आदरणीय पवार हे महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरले आहेत. यांनी महाराष्ट्राला दिशा दिली आहे, सबुरीने घ्या नाहीतर तुमच्या राजकारणाचा इतिहास काढावा लागेल. एक दिवस सविस्तर बोलू. पवार यांचे स्थान कोणी घेऊ शकत नाही, जसे बाळासाहेबांचे स्थानांतर आमच्या हृदयात आहे. तसेच स्थान आदरणीय शरद पवार यांच्या विषयी आहे. फार बोलता आता बस एवढेच.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*💐वाढदिवस अभिष्टचिंतन💐*
_🎂💐शिवसेना युवा नेते *मा.श्री.संदेश पारकर* यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!_
*▪️शुभेच्छुक:-*
*मा.श्री. वैभव नाईक*
(कुडाळ मालवण मतदारसंघ,आमदार )
*मा.श्री. संजय पडते*
(शिवसेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग)
*मा.श्री. सतीश सावंत*
(माजी जिल्हा बँक अध्यक्ष)
*मा.श्री. सुशांत नाईक*
(जिल्हा बँक संचालक)
*मा.श्री. अँड. हर्षद गावडे*
( युवा सेना माजी जिल्हाप्रमुख)
तसेच तमाम सिंधुदुर्ग शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_