कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 “बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत मळगांव येथील शारदा विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीनी लुटला शेतीचा आनंद..

*🟥 तरवा काढणी, भात लावणी आदी कामांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-०९ :-* “बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत मळगांव येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक, पालक व विद्यार्थी-विद्यार्थीनीनी “बांधावरची शाळा” उपक्रमांतर्गत

शेतीचा आनंद लुटला.मळगांव येथील प्रगतशील शेतकरी राजन राऊळ यांच्या शेतात जाऊन या विद्यार्थी-विद्यार्थीनीनी प्रत्यक्ष तरवा काढणी, भात लावणी आदी शेतीच्या कामांचा आनंद लुटला.

विद्यार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनीना बालवयापासूनच शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्धल आदर व प्रेम निर्माण व्हावे, आपला देश शेतीप्रधान असल्याने शेती विषयी माहिती मिळावी, मुलांना शेतीचे महत्व पटावे, शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाणांची ओळख व्हावी, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने बळीराजासाठी एक दिवस”हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळा मध्ये राबविला जातो. मात्र गेले दोन वर्ष कोरोना महामारीच्या कालावधीत शाळा बंद असल्याने हा उपक्रम राबविला नव्हता. मात्र आता पुन्हा शाळा सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे

याच उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व मुलांनी शेतीत जाऊन “बळीराजासाठी एक दिवस ” या उपक्रमात सहभाग घेतला..

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, शिक्षिका सीमा सावंत, शेतकरी राजन राऊळ, पालक व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. राजन राऊळ यांनी मुलांना शेतीविषयी माहिती दिली. मुलांना आधुनिक शेती अवजारांची प्रात्यक्षिक दाखवत ती कशी चालवावीत, याविषयी माहिती दिली. यावेळी शाळेतील शिक्षक व मुलांनी तरवा काढणी, लावणी आदी कामांचा आनंद लुटला. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

 

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!