🟥 सिंधुदुर्गात जिजाऊ फाऊंडेशन सीबीएससी दर्जाची शाळा उभारत मोफत शिक्षण ; गोट्या सावंत
*🟥 आशिये,सातरल,कासरल गावात विद्यार्थ्यांना जिजाऊ फाऊंडेशनतर्फे मोफत वह्या वाटप ; तालुक्यातील शाळांमध्ये दीड लाख वह्यांचे वाटप होणार..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली दि.०९ जुलै :-* जिजाऊ फाऊंडेशन अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात गेली पाच वर्षे वह्या वाटप केले जात आहे.यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांना दीड लाख वह्या वाटप करत आहोत.गरिबांसाठी सामाजिक बांधिलकी जपत निलेश सांबरे काम करत आहेत.भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिजाई फाऊंडेशन माध्यमातून सीबीएससी दर्जाची शाळा उभारत सर्वसामान्य मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निलेश सांबरे यांचा संकल्प असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले.
आशिये,सातरल,कासरल या गावांमध्ये जिजाऊ शैक्षणिक,सामाजिक संस्था पालघर व युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत वह्यावाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.आशिये येथे उपसरपंच संदीप जाधव,माजी सरपंच शंकर गुरव,पत्रकार भगवान लोके,सातरल सरपंच प्रदिप राणे, कासरल सरपंच गुरू चव्हाण, सोसायटी चेअरमन दत्ताराम आमडोस्कर, रवींद्र राणे, बाबू राणे, सुशील राणे, समीर राणे, सुहास बागवे, प्रसाद सावंत, विनोद परब, सुशील तिरलोटकर,
मुख्याध्यापिका अनघा लाड,शिक्षक जातेकर, सावंत मॅडम,मोरे मॅडम शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी गोट्या सावंत म्हणाले,
पालघर येथील आदिवासी भागात गोरगरीब लोकांसाठी काम करणारे निलेश सांबरे आमचे मित्र आहेत. जिजाऊ फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी भागात सिबीएससी दर्जाच्या ६ स्कुल मोफत शिक्षण हजारो विद्यार्थ्यांना देत आहेत.गरिबांसाठी रुग्णालय,
रुग्णांना १५ रुग्णवाहिका,दरवर्षी ५ लाख वृक्ष लागवड ,यूपीएससी एमपीएससी मुलांसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचे काम निलेश सांबरे करत आहेत. त्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत सिबीएससी दर्जाची मोफत शाळा सुरु करण्याचा मानस आहे.मी युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि ते जिजाई फाऊंडेशन मार्फत एकत्र काम करण्यामागचा एकच सामाजिक बांधिलकी हा हेतू आहे.मुलांना वह्या वाटप हा खारीचा वाटा आहे.नजीकच्या काळात या आशिये शाळेला चांगली इमारत देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आशिये गावातील माझा मित्र महेश गुरव याची गावाबद्दल कायम तळमळ असते.मला भेटल्यावर गावातील कोणतातरी विकासाचा प्रश्न असतो.सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले महेश गुरव सारखे कार्यकर्ते भाजापात असल्याचा पक्षाला व मला सार्थ अभिमान आहे,अशा शब्दांत कौतुक गोट्या सावंत यांनी केले.
माजी उपसभापती महेश गुरव म्हणाले,गेली १०-१२ वर्षे युवा संदेश
प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम
गोट्या सावंत करत आहेत.मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन, शिष्यवृत्ती सराव परीक्षा ,सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा यावर्षी ५४०० विद्यार्थी सहभाग,१० वी पूर्व परीक्षा शिबीर, गुणवंत विद्यार्थी सत्कार,व्यायामशाळा,वाचनालय, कराटे प्रशिक्षण, रक्तदान शिबीर, मोफत रुग्णवाहिका, आरोग्य शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मॅरेथॉन स्पर्धा,पोलीस भरती प्रशिक्षण, वारकरी संप्रदाय मेळावा,शेतकऱ्यांना खत वाटप,भजन स्पर्धा,दशावतार महोत्सव, लक्षवेधी आंबे खाण्याची स्पर्धा हे उपक्रम राबवत आहेत.तळागाळातील जनतेसाठी गोट्या सावंत चांगले काम करत आहेत.
जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उभारलेले काम गौरवास्पद आहे.आता या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नावलौकिक वाढविण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.
आशिये,सातरल,कासरल या गावातील १०२ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप गोट्या सावंत,महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे शिक्षकांनी मानले.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

