मोती तलावाच्या खचलेल्या कठड्याचा व मोती तलावाचा खर्च अभियंत्याच्या व मुख्याधिकारी यांच्या खिशातून करावा ; जनतेची मागणी
*🟥 मोती तलावाच्या खचलेल्या कठड्याचा व मोती तलावाचा खर्च अभियंत्याच्या व मुख्याधिकारी यांच्या खिशातून करावा ; जनतेची मागणी*
*🟥 उंटावरून शेळ्या हाकून , भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता निर्णय घेतल्याने, मोती तलाव चा कठडा धोकादायक..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-०८ :-* नगरपालिका प्रशासनाने घाई गडबडीत मोती तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले त्यातुन काय साध्य केले असा प्रश्न सध्या सामान्य नागरिकांना पडला आहे,न प,प्रशासनातले उंटावरून शेळ्या हाकणारे बांधकाम अभियंता यांची कसली खातर जमा न करता,मोती तलावाचा भूगोल, इतिहास समजून न घेता मोती तलावाच्या काठाच्या बाजूने गाळ काढायला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी सांगितले मुळ ढाच्याला हानी पोहचतेय पावसाळ्यात तलावाचा भाग कोसळणार आणि तसेच झाले,गाळ काढलेला संपूर्ण भाग कोसळला तर काही कोसळण्याच्या मार्गावर आहे,आता याची होणार हि दुरूस्ती संबंधित बांधकाम अभियंता,व मुख्याधिकारी यांच्या खिशातून करावी जनतेच्या पैशातून नको असे आमचे स्पष्ट मत आहे.
उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या नगरपालिका अधिकार्यांना अद्दल ही घडलीच पाहिजे,जनतेच्या करातून ही दुरूस्ती करायला आमचा ठाम विरोध आहे,ज्या अधिकार्यांच्या देखरेखे खाली हे काम झाले, ज्यांनी या कामाला मंजुरी दिली,त्या अधिकाऱ्यांच्या खिशाला चाट बसली तर भविष्यात असे आतातायी पणाचे निर्णय घेताना ते एक वेळा नाही तर शंभर वेळा विचार करतील,
वास्तविक मोती तलावातील गाळ हा तलाव कोरडे करून आत यंत्र सामुग्री उतरवून मधून सुरवात करायला हवी होती,मात्र या ठिकाणी शायनिंग इंडिया करण्यासाठी भुल भुलैय्या करण्यात आला,तळ्याच्या काठावर म्हणजेच फुटपाथवर हजारो टनाचे यंत्र चढवून बाहेरुनच गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले,ही फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक होती,कारन राजवट होती प्रशासकाची,विचारणार कोणाला? शिवाय जाब विचारायला मुख्याधिकारी जागेवर भेटायला हवेत,अनेक नागरिकांनी बोलून दाखवले की मोती तलावाचा फुटपाथ कोसळणार आम्ही तसे लिहीले पण ,पण उच्च शिक्षित बांधकाम अभियंता,यांचे अनुभवापेक्षा कागदी घोडे मोठे, शिवाय त्यांना साथ प्रांताधिकारी पानवेकर मग यांचा घोडा रेस च्या घोड्या पेक्षा उधळणारच त्याला रोखणार कोण आणि सध्याच्या कलियुगात या उथळलेल्या घोड्याला रोखायला लव कुश कुठे आहेत , त्यामुळे तो घोडा पैलतीरावर गेला आणि पहिल्याच पावसात पैलतीर कोसळला,
तीन वर्षांपूर्वी डागडुजी केलेला फुटपाथ पाण्यात गेला,व संध्याकाळच्या वेळी मोती तलावा भोवती फिरणाऱ्या जेष्ठ नागरिकांची अडचण झाली कारन धोकादायक फुटपाथाला संरक्षक कुंपण घालण्यात आले आहे, त्यामुळे जीव मुठीत घेऊन जेष्ठ नागरिकांना फेरफटका मारावा लागत आहे, त्यामुळे ते ही प्रशासनाच्या या कामावर नाराच आहेत.
नगरपालिकेचे काम म्हणजे बिलासाठी दोन वर्ष थांब असा ठेकेदारांचा अनुभव, त्यामुळे नगर पालिकेच्या कामांचा ठेका घ्यायला कंत्राटदार सहसा पुढे येत नाहीत,बील वेळेवर होत नाही असा अनुभव गाठीशी असल्याने कोणी काम करण्याचे धाडस करत नाही, आणि अशी उदार होऊन कामे करायला तो ठेकेदार गडगंज श्रीमंत तरी असायला हवा,जो करवंटीतील लोणचे आहे असा ठेकेदार असेल तर तो भिकेला लागेल याची हमी आम्ही देतो,याचे एकमेव कारन बा़धकाम विभागातिल अधिकार्यांची आपली घरातील कामेच संपत नाही,मग जनतेची कामे कशी करणार, आणि दुसरे कारण म्हणजे ते वर्षोनुवर्षे एकाच जागी आहेत त्यामुळे त्यांची मनोपाली आहे,मी करेन ते,मला कोण विचारणार,ही मोडीत काढायची असेल तर त्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होणे गरजेचे आहे असे आमचे ठाम मत आहे.
सुंदर वाडीचे नाक म्हणजे मोती तलाव ,,त्याची सध्याची अवस्था पाहून , पुण्यश्लोक बापू साहेब महाराज,शिवराम राजे भोसले साहेब, यांनाही वाईट वाटत असेल आम्ही जे वैभव टीकवले होते,त्याची कशी वाट लागत आहे, कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता जो घाई गडबडीत निर्णय घेण्यात आला तोच मुळी चुकीचा असल्याने बेजबाबदार पणाने वागणार्या या अधिकाऱ्यांच्या खिशातून दुरुस्ती साठी होणार खर्च करावा असे आमचे ठाम मत आहे,अन्यथा जनतेच्या पैसा पाण्यात घालणार्या अधिकार्यांना निलंबित करावे या मागणीसाठी आम्हाला पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण छेडावे लागेल याची नोंद घ्यावी.

