शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही…उद्धव ठाकरे(शिवसेना पक्षप्रमुख)

🛑शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही…उद्धव ठाकरे(शिवसेना पक्षप्रमुख)

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई,१जुलै : सत्ता येते-जाते परत येते, परंतु लोकांच्या अश्रूची प्रतारणा केली नाही. विचित्रपणाने शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होणं हे जनतेला आवडेल न आवडेल माहिती नाही परंतु हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. तो धृतराष्ट्रासारखा नाही. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याप्रकारे हे सरकार स्थापन झाले. तथाकथित मुख्यमंत्री केला. हेच मी अडीच वर्षापूर्वी सांगत होतो. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा काळ वाटून घ्यावा हेच अमित शाहांशी बोलणं झाले होते. मग त्यावेळेला नकार देऊन आत्ताच हे का घडलं? लोकसभेला, विधानसभेला आपण एकत्र होतो. आधीच हे घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता असे त्यांनी सांगितले.
लोकशाहीचे चार स्तंभ असतात, या चारही स्तंभाने लोकशाही वाचवायला पुढे यायला पाहिजे. लोकशाही उरली नाही तर या स्तंभाला काहीही अर्थ राहणार नाही. आपल्याकडे गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. ज्याने मतदान केले त्याला कळायला हवं कुणाला मतदान हवं. आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. निवडून आलेल्या प्रतिनिधीला बोलावण्याचा अधिकार हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. माहिमच्या मतदाराने टाकलेले मत व्हाया सूरत, व्हाया गुवाहाटी गोवा फिरत असेल तर लोकशाही आहे कुठे ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
*मातोश्रीत दिलेला शब्द पाळला असता तर*…
लोकशाहीत सर्वोच्च मतदार असतो. त्याचा बाजार अशाप्रकारे मांडलेला असतो ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे. मातोश्रीत दिलेला शब्द पाळला असता तर आत्ताचे सरकार शानदारपणे झाले असते. माझ्या पाठित सुरा खुपसला तो मुंबईकरांच्या पाठित खुपसू नका. मला दिलेला शब्द पाळला असता तर अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता, यात भाजपाच्या मतदारांना काय मिळालं हे
कळत नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
*माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका*
तसेच माझ्यावर राग आहे, पण त्याचा राग मुंबईवर काढू नका. एका रात्रीत आरेतील कारशेडबाबत निर्णय बदलण्यात आला. मी विकासाच्या आड येत नाही. मी पर्यावरणवादीच्या सोबत आहे. संभ्रम होतो ती गोष्ट टाळलेली बरी. माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. अहंकार नाही. आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून मुंबईच्या पर्यावरणाला हानी पोहचेल, आज आरेचा भाग घेतल्यानंतर त्याच्या आजूबाजूला खासगी विकासक येतील, वन्यजीव धोक्यात येईल, कांजूरची जमीन महाराष्ट्राच्या हितासाठी वापरा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!