गोव्यातून विषारी दारू सिंधुदुर्गात आणणारे दारु तस्कर पुन्हा सक्रिय
*🟥गोव्यातून विषारी दारू सिंधुदुर्गात आणणारे दारु तस्कर पुन्हा सक्रिय*
*🟥पक्या,बाबा,अजू,गौरु,बाबू,ही चर्चेतील नावे पुन्हा एकदाआघाडीवर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:१३ जून*
गोव्यातून सिंधुदुर्गात येणार्या अवैद्य दारू चा पुरवठा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढला असून दारु तस्कर बर्याच काळाच्या विश्रांतीनंतर सक्रीय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे, राज्य उत्पादन शुल्क विभाग व सिंधुदुर्ग पोलीस यांनी डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधलेली असल्याने गोव्यातून लाखो रुपयाची विषारी दारू सिंधुदुर्गात व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात पुरवठा होऊ लागली आहे,या दारू मुळे अनेकांचे जीव गेले असून प्रशासकीय यंत्रणा मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम करीत आहेत, या धंद्यातील पक्या, बाबा, गौरू, अजू,राजू,बांबा,मामा,बिरु, बावळट केसरी मार्गे दारूच्या गाड्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन घेऊन जात आहेत.
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने गेली तीन वर्ष अवैद्य दारू धंदा व गांजा तस्करी विरोधात जोरदार मोहीम उघडली, यानंतर या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसला होता, मात्र राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी बदलले आणि दारु तस्कर अधिकाऱ्यांना मॅनेज करून ,नाक्यावरील पोलिसांना हाताशी धरून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गोव्यातील दारू सिंधुदुर्गात घेऊन येऊ लागले आहेत, त्यामध्ये दारू धंद्यातील जुनी टीम पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली होती, एकाच गुन्ह्यात तोच तोच आरोपी पुन्हा आढळल्यास शासन निर्णयानुसार त्याच्यावर तडीपारीची कारवाई होऊ शकते, मात्र पोलीस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी हे कागदी घोडे नाचवून दारु तस्करांना पाठीशी घालण्यासाठी अशी कारवाई करण्यास पुढे सरसावत नाही, मात्र यावर संपादकीय सदरातून आम्ही वारंवार आवाज उठवल्यानंतर अशा प्रकारचे तडीपार चे प्रस्ताव तयार केले गेले, मात्र त्या प्रस्तावाचे पुढे काय झाले याचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडे नाही व ते उत्तर नसल्यामुळेच पुन्हा एकदा दारू तस्कर सक्रिय झाले आहेत.
या दारू धंद्यामुळे अनेकांचे ऐन तारुण्यात बळी जाऊन कुटुंबे उघड्यावर पडली आहेत, तर दारू माफिया मोठ,मोठ्या महागड्या गाड्या फिरवून अलिशान जीवन जगत आहेत, दारू पिणारे मात्र वर्षभरातच परतीच्या प्रवासाला लागतात व याला सर्वस्वी जबाबदार पोलिस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क विभाग असल्याचे आमचे म्हणणे आहे.
अवैध धंद्यातून मिळणाऱ्या पैशावर दहशत निर्माण करायची आणि सर्वसामान्य जनतेला त्रास द्यायचा, वाटेत गाडी दुकानासमोर लावून दादागिरी करायची हे धंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत,तर काही निर्जन ठिकाणे या माफीयांचे अड्डे बणले आहेत, स्थानिक ग्रामस्थ जर तक्रार करायला गेले तर त्यांना थेट दादागिरी केली जायची या प्रकारावर आम्ही प्रकाश झोत टाकल्यावर बऱ्याच प्रमाणात अशा प्रकारांना आळा बसला व काही जण भूमिगतही झाले होते
मध्यंतरी च्या उठावा नंतर पोलीस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपी गेलेले जागे झालेत व मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायल सुरवात झाली व त्यानंतर जुणे दारु तस्कर बेपत्ताच झाले व नवीन मुलं या धंद्यात उतरली आणि झटपट श्रीमंत होण्याच्या नादात ऐन तारुण्यातील ही मुले आपले आयुष्य उध्वस्त करुन घेऊन आई वडिलांच्या स्वप्नांची राख रांगोळी करत आहेत, दोन्ही यंत्रणेने आपले काम प्रामाणिकपणे केल्यास अशा धंद्याना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल असे आमचे ठाम मत आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

