कणकवलीशैक्षणिकसिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्याच्या शालेय, शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने जि.प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ची निवड..

▪️लवकरच शासनाच्या वतीने राज्यातील “मॉडेल स्कुल” म्हणून या शाळेचा विकास करण्यात येणार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴खारेपाटण,दि.३०: महाराष्ट्र राज्याच्या शालेय, शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने नुकतेच जिल्हा परिषदेच्या राज्यातील ​३०० आदर्श शाळांची निवड करण्यात आली असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जि. प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेची निवड झाली आहे. लवकरच शासनाच्या वतीने राज्यातील “मॉडेल स्कुल” म्हणून या शाळेचा विकास करण्यात येणार आहे. शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. मार्च ​२०२० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या द्वितीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील या ​३०० शाळांची नावांची यादी घोषित करण्यात आली. इयत्ता ​१ ते ​७ वी पर्यंत असलेल्या मोजक्याच विशेष शाळांची निवड आदर्श शाळा म्हणून करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिह्यातील वैभववाडी,​ ​देवगड, मालवण,​ ​दोडामार्ग,​ ​कुडाळ व कणकवली या ​६ तालुक्यातील प्रत्येकी एका शाळेची निवड शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

यामध्ये कणकवली तालुक्यातील जि. प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेची निवड झाल्यामुळे खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. गौरी शिंदे, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, उपाध्यक्ष आणा तेली,​ ​पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ऋषिकेश जाधव,​ ​माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.शेट्ये,​ ​समिती सदस्य प्रदीप इसवलकर,​ ​मनोज करंदीकर,​ ​शिवाजी राऊत यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

खारेपाटण तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे,​ ​केंद्र प्रमुख नारायण ओटवणेकर,​ ​सद्गुरू कुबल यांनी आज खारेपाटण केंद्र शाळा येथे भेट देऊन खारेपाटण शाळेचे मुख्यध्यापक ​श्री. ​श्रावणकर यांचे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. खारेपाटण केंद्र शाळा ही ​१ ऑगस्ट ​१८६० साली स्थापन झहलेले असून या शाळेने ​१५० वर्षे पूर्ण केली आहेत आजपर्यंत या शाळेला बिविध पुरस्कार मिळालेले आहेत यामध्ये “राज्यस्तरीय सर्वांग सुंदर आदर्श शाळा “हा पुरस्कार औरंगाबाद येथील एका संक्षेच्या वतीने देण्यात आलेला आहे. तसेच शिक्षक भरती या संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिह्यातील आदर्श शाळा म्हणून देखील या शाळेला पुरस्कार मिळालेला आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या “राज्यस्तरीय शिक्षणाची वारी ” या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्हयातून एकमेव खारेपाटण केंद्रशाला नं.१ या शाळेची निवड झाली होती. यामध्ये या शाळेने “शाळेच्या सर्वांगीण विकासात शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी” तथा “लोकसहभागातून शाळांचा सर्वांगीण विकास” या विषयावर आधारित स्टोल लावला लावला होता.​ ​त्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. सर्व भौतिक सोयी सुविधा उपलब्ध असलेली निसर्ग संपन्न उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेची सध्या जिल्ह्यात एक वेगळी ओळख असून आजपर्यंत या शाळेला अनेक राजकीय पदाधिकारी तर प्रशासनाच्या वरिष्ठ ​अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिलेल्या असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयातील सुमारे ​१५० शाळांच्या शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक मुख्यध्यापक व केंद्रप्रमुख यांनी या शाळेला भेटी देऊन येथील शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या कार्याची माहिती जाणून घेतली आहे. लोकसहभागातून सुमारे ​५० लाखांपेक्षा अधिक शैक्षणिक उठावा अंतर्गत रक्कम गोळा करून शाळेवर खर्च करण्यात आली.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!