छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आजच्या प्रत्येक माणसाने कार्य केले पाहिजे ; दिवाकर राऊळ
*🟥 छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आजच्या प्रत्येक माणसाने कार्य केले पाहिजे ; दिवाकर राऊळ*
*🟥 प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-०७ :-* आपल्या धर्माबरोबर इतर धर्माच्या लोकांशी सलोखा राखण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले.शिवाजी राज्यानी जात- धर्म या पलिकडे जाऊन सुराज्य निर्माण केले.या सर्वाचा आदर्श आजच्या प्रत्येक माणसाने डोळ्यासमोर ठेऊन कार्य केले पाहिजे,असे विचार प्रमुख अतिथी दिवाकर राऊळ यांनी मांडले. कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात सोमवारी संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात ते बोलत होते.हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी पुढे बोलताना राऊळ सर यांनी शिवाजी महाराज यांचे कार्य याबाबत विचार मांडले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवाकर राऊळ,प्रमुख उपस्थित म्हणून दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ,सेवानिवृत्त कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, वाचनमंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर,उपाध्यक्ष बाबली नार्वेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शेखर पाडगावकर यांनी शिवरायांचा जीवनपट प्रेक्षकासमोर मांडला.तसेच त्यांनी दुर्गसेवक सुनील राऊळ करीत असलेले कार्य खूप मोलाचे आहे.त्याला समाजातील लोकांनी प्रोत्साहन देऊन दुर्गसंवर्धन करण्यास मदत केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
दुर्ग सेवक सुनील राऊळ यांनी शिवरायांनी बांधलेले किल्ले याचे संवर्धन करावयाचे असून ते तरुण पिढी जोमाने करीत आहे,याचा अभिमान आम्हाला आहे.यासाठी तुमच्या पाठींब्याची आवश्यक ता आहे,असे मत व्यक्त केले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले,त्यानंतर वाचनालयात असलेल्या शिवाजी महाराज्यांवरील पुस्तकाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन ही करण्यात आले.
या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचनालयाच्या कार्यक्रमाची माहिती विषद करून सर्व वाचक,हितचिकानी या वाचनालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.यापुढे वाचनालय विध्यार्थी वर्गाबरोबर शेतकरी,महिला,वयोवृद्ध लोकांसाठी निरनिराळे उपक्रम राबविणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी रेश्मा शिरोडकर व निधी राऊळ यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी हा पोवाडा सुंदर रीतीने सादर केला,तर पूर्व चांदोरकर हिने माता जिजाऊ यांची शिवरायांच्या प्रति असणारी भूमिका सादर केली,वाचनालयाच्या संचालिका सौ.स्नेहा खानोलकर यांनी शिवरायांचा जीवनप्रवास मांडला.
शेखर पाडगांवकर यांनी पोवाडा गायलेल्या मुलींना रोख रक्कम देऊन गौरव केला,तर नूतन बांदेकर गोवेकर यांनी मुलांसाठी खाऊ दिला.
या कार्यक्रमास शिवप्रेमी,वाचक,सभासद,विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज बांदेकर,आभार गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनमंदिर चे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

