दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग च्या माध्यमातून किल्ले सोनगडवरील मार्गावर लावण्यात आले मार्गदर्शक फलक
🟥दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग च्या माध्यमातून किल्ले सोनगडवरील मार्गावर लावण्यात आले मार्गदर्शक फलक
🟥जिल्हाध्यक्ष गणेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सिंधुदुर्ग,६जुन- कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता आपण या समाजाचे काही देणे लागतो या एका उदात्त हेतूने “दुर्ग मावळा प्रतिष्ठान” कोकण विभाग गेली काही वर्षे सामाजिक कार्यासोबत दुर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. दिनांक ५ जून २०२२ रोजी किल्ले सोनगडावरील गड संवर्धनाची सुरुवात सोनवडे घाट रास्तामार्गे सोनगडावर जाणाऱ्या मार्गावर मार्गदर्शक फलक लाऊन करण्यात आली.
किल्ले सोनगडावर जाण्यासाठी सोनवडे घाट रस्ता, दुर्गवाडी तसेच पवारवाडी मार्गे अशा तीन वाटा आहेत. किल्ले सोनगडावर जाण्याऱ्या वाटांवर दुर्गपर्यंटनासाठी मार्गदर्शक फलकांची आवश्यकता भासत होती. दुर्ग मावळा परिवारामार्फत किल्ले सोनगडावरील दुर्गसंवर्धनाची सुरुवात सोनवडे घाट रस्ता मार्गे गडावर जाणाऱ्या वाटेवर मार्गदर्शक, महितीदर्शक व सूचना फलक लावून करण्यात आली. पुढील टप्प्यात दुर्गवाडी
आणि पवारवाडी मार्गावर मार्गदर्शक, महितीदर्शक तसेच सूचना फलक लावण्यात येणार आहेत. या फलकांसाठी श्री दिगंबर विश्राम गुरव (सोनवडे तर्फ कळसुली), श्री आदेशकुमार शाम भगत (फोंडा-गोवा), यशवंत अनंत गावकर ( कुपवडे), महेश निकम (शिरशिंगे) यांनी सौजन्य केले. या फलकांच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी दिगंबर विश्राम गुरव, विश्राम दिगंबर गुरव, भिवा सावंत, दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागचे अध्यक्ष गणेश नाईक, सरचिटनिस सुनिल करडे, सामाजिक विभाग प्रमुख समीर धोंड, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रसाद सुतार, कार्याध्यक्ष पंकज गावडे, किल्ले सोनगड संवर्धन प्रमुख सुहास गुरव, मनोहर गड संवर्धन प्रमुख रोहन राऊळ, मनसंतोष गड संवर्धन प्रमुख नितेश घावरे, विशाल परब, किरण सावंत उपस्थित होते.
———————————————
*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*
सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃
*_👔रोवस्त्रा🥼_*
*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!
*_🥻राऊत आणि कंपनी👗_*
*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!
*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४
———————————————————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

