चंदगड मधील पर्यटकांना लुटल्या प्रकरणी तीन महिला सहित सहा जणांना अटक

🟥चंदगड मधील पर्यटकांना लुटल्या प्रकरणी तीन महिला सहित सहा जणांना अटक

🟥अन्य पाच संशयित आरोपींचा शोध जारी..

🟥गोव्याची बदनामी सहन करणार नाही छत्रपतींचा अवमान आहे.. पर्यटन मंत्री रोहन खवंटे

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴म्हापसा,१जून: गोव्यात पर्यटक म्हणून आलेल्या चंदगड (कोल्हापूर) येथील ११ विद्यार्थ्यांना जबर मारहाण करून लुटल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी आणखी एका कारवाईत याप्रकरणात सहभागी असलेल्या म्हापशाच्या बोशन होममधील ‘इन डिओर हेअर सलून अँड ब्युटी स्पा’ मधील तीन संशयित महिलांना अटक केली असून या स्पा चालकांनी / मालकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे, अशी माहिती म्हापसा पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.
पर्यटकांना लुटण्याची ही घटना २३ मे रोजी झाली होती, तक्रारीनंतर म्हापसा पोलिसांनी या प्रकरणातील संशयित सचिन भारद्वाज (२६) आशिष जागीर सिंग (२७) दोघेही रा. गुरगाव, हरियाणा व मुबारक अली मौला (२०) रा. तमिळनाडू या तिघांना अटक केली होती, त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
या प्रकरणातील अन्य संशयिताचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे. पे फोनच्या माध्यमातून लुटीचे पैसे वसूल केलेल्या सचिन भारद्वाज आहे. याच्या बँकेचे अकाऊंट सीज
करण्यात येणार असल्याचे निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, या पर्यटकांना मारहाण करून लुटल्याप्रकरणाची दखल घेत पर्यटनमंत्री या नात्याने रोहन खंवटे यांनी म्हापसा पोलिस ठाण्यात भेट देऊन निरीक्षक परेश नाईक यांच्याशी चर्चा केली. पर्यटकांना लुटण्याचे प्रकार गोव्यात होत असतात. किनारी भागात दलालांची रॅकेट कार्यरत असतात. अशा बेकायदा दलालांना अटक करण्याची तसेच राज्यात बेकायदेशीर रित्या कार्यरत असलेल्या स्पा वर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी स्पष्ट केले.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!