आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मृद व जलसंधारण उपविभागाची शासनाने स्वतंत्र निर्मिती केली-रविंद्र मडगावकर

*🟥आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मृद व जलसंधारण उपविभागाची शासनाने स्वतंत्र निर्मिती केली-रविंद्र मडगावकर*

*🟥 सावंतवाडी तालुक्यासाठी व जलसंधारण विभागाची उपशाखा मंजूर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड*

*🎴 सावंतवाडी, दि.:३१,मे*
आपण गेली चार वर्षे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने त्याचे फलीत म्हणून तालुक्यासाठी मृद व जलसंधारण उपविभागाची शासनाने स्वतंत्र निर्मिती केली असून त्याबाबतचा अध्यादेश नुकताच पारित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी आज येथे दिली.
या विभागाशी निगडीत विकास कामांना आता चालना मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. मडगावकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, सावंतवाडी तालुक्याला स्वतंत्र मृदू व जलसंधारण विभागाची आवश्यकता होते. हा विभाग सावंतवाडीला नसल्याने येथील विकास कामांना गती मिळत नव्हती. सावंतवाडी तालुका हा वेंगुर्ला तालुक्याला जोडला होता. त्यामुळे तेथील उपविभागा अंतर्गत तालुक्याचा कारभार चालवला जात होता. एकूणच सावंतवाडी तालुक्यावर होणारा हा अन्याय लक्षात घेता आपण स्वतंत्र उपविभाग तालुक्याला उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी सावंतवाडी पंचायत समितीच्या बैठकीमध्ये वारंवार हा प्रश्न उपस्थित करत त्या संदर्भात आवाज उठवला. त्यानंतर मंत्रालयापासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वेळोवेळी पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा
परिषद सदस्य उत्तम पांढरे व रणजित देसाई यांनी या संदर्भात ठराव मांडला. हा ठराव मुळात आयुक्त जलसंधारण यांच्याकडे पाठवणे आवश्यक असताना तो प्रादेशिक जलसंधारण ठाणे विभागाकडे पाठविण्यात आल्याने चुकीच्या पद्धतीचा फटका बसला. आणि तब्बल दोन वर्ष हा ठराव लालफितीत अडकून पडला. चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारत पुन्हा एकदा पाठपुरावा सुरू केला. आज याला यश आले असून शासनाने नुकतीच सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती केली आहे. त्यासाठी आवश्यक पंधरा कर्मचाऱ्यांचा स्टाप ही नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील कामे शीघ्र गतीने मार्गी लागणार आहे.
श्री.मडगावकर पुढे म्हणाले, या ठिकाणी मंजूर झालेल्या मृदू व जलसंधारण उपाय विभागासाठी शासनाच्या आकृतीबंध नियमाप्रमाणे या ठिकाणी उपअभियंता कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, अनुरेखक, वाहन चालक, परिचर चौकीदार अशी एकूण १५ पदे मिळणार आहेत. सद्यस्थितीत उपविभाग मंजूर झाल्याने आपल्या पाठपुराव्याला एक प्रकारे यश आले आहे. यापुढे ज्या प्रमाणे या ठिकाणी पदी नियुक्त करण्यात येणार आहेत. ते १५ प तात्काळ स्वरुपात देण्यात यावीत, अशी मागणी आपण शासन स्तरावर लावून धरणार आहे. आपण गेल्या चार वर्षापासून सुरू केलेल्या या लढाईमध्ये पंचायत समिती सर्व सहकारी व अनेकांचे सहकार्य लाभले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

9422436090/9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!