शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्या वेत्ये येथील सुनील गावकरचा मृतदेह सापडला
*🟥शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्या वेत्ये येथील सुनील गावकरचा मृतदेह सापडला*
*🟥जर राज स्पोर्ट्स सुरु असते तर सुनीलचा जीव वाचला असता असे मत ग्रामस्थांकडू व्यक्त*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी, दि.:२५ मे*
आपल्या गावातील मित्र व सहकाऱ्यांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेल्यानंतर शिरोडा समुद्रात बुडालेल्या तालुक्यातील वेत्ये गावातील तरुणाचा मृतदेह सापडला आहे.हा तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी हा तरुण शिरोडा समुद्रात पोहण्यासाठी दुपारी 3.30 नंतर उतरल्यानंतर काही वेळाने घडली होती.तब्बल 19 ते 20 तासानंतर सुनील देवू गावकर ( वय वर्ष 45) या दुर्दैवी तरुणाचा मृतदेह शिरोडा समुद्रात दिसून आला. हा तरुण बुडल्याची माहिती त्याच्या सोबत शिरोडा समुद्रावर पोहण्यासाठी गेलेल्या त्याच्या इतर मित्रांनी दिल्या नंतर तसेच याबाबतची रितसर माहिती हितेंद्र गावकर यांने पोलिसांना
दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत त्याचा शोध करण्यात आला. मात्र समुद्राला उधाण असल्याने व मृतदेह रात्री कुठेच दिसत नसल्याने समुद्रात खोलवर जाऊनही शोधकार्य यशस्वी होऊ शकले नाही. सकाळ पर्यंत किनाऱ्या पासून काही अंतरा पर्यंत ही शोध मोहीम सुरू होती.या शोध मोहिमेत शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, ग्रामपंचायत सदस्य कौशिक गावडे, पोलीस कॉन्स्टेबल दळवी, पोलीस योगेश राऊळ, ग्रामविकास अधिकारी सुनिल चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आबू, आपा साळगावकर व अन्य ग्रामस्थांनी अथक मेहनत घेतली.तसेच घटनास्थळी पोहचलेल्या गावकर यांचे नातेवाईक व वेत्येतील ग्रामस्थांनीही शोधकार्य केले.मात्र सध्या पावसाळी वातावरण असल्याने व समुद्रात उधाण आले असल्याने शोध घेणे कठीण ठरले.
बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास गावकर याचा मृतदेह समुद्रात तरंगताना दिसून आल्या नंतर समीर भगत, उदय भगत, संतोष भगत, सुरज अमरे, आजू अमरे यांनी समुद्रात उतरुन सुनील याचा मृतदेह किनाऱ्यावर आणला. यानंतर वेंगुर्ला पोलिसांना बोलवण्यात आले.
दरम्यान या घटनेमुळे शिरोडा समुद्र किनाऱ्यावर कार्यरत असलेली राज स्पोर्ट्स सुरू असती तर सुनील याचा जीव वाचला असता असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कारण राज स्पोर्ट्सने यापुर्वी 25 ते 30 जणांचे जीव जेस्कीच्या सहाय्याने वाचवला होते असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगिताना राज स्पोर्ट्स च्या धाडसी कर्मचाऱ्यांची आठवण काढली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

