🟥 मांगेली वासीयांचे कर्नाटक वनविभागाला ‘जशास तसे’ उत्तर..
🟥 कर्नाटकातील सडा भागात वनक्षेत्राकडे जाणारा रस्ताच टाकला खोदून..
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१९ :- कर्नाटक वनविभागाने मांगेली सडा रस्त्याचे डांबरीकरण रोखल्याने कर्नाटक सडा येथील वनहद्दीत जाणारा रस्ता बंद करून मांगेलीवासीयांनी कर्नाटक वनविभागाला ठोशास ठोसा दिला. आपल्या खासगी जमिनीतून जाणाऱ्या रस्त्याचा वापर कर्नाटक वनविभाग करत होते. तोच रस्ता एका ठिकाणीं दगड टाकून व दुसऱ्या ठिकाणीं जेसीबी यंत्राने चर खोदून गावकऱ्यांनी बंद केला.
आमदार दीपक केसरकर यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राचे पिढ्यान पिढ्यांचे रोटी बेटीचे व्यवहार लक्षात घेवून जवळच्या मांगेली सडा रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून कोट्यवधीचा निधी मंजूर केला. रस्त्याचे डांबरीकरणाचे कामही व्यवस्थित सुरू होते; पण जिथे महाराष्ट्र हद्दीतील काम संपणार होते, ती हद्द आपली आहे असा दावा करून कर्नाटक वनविभागाने काम बंद पाडले. ठेकेदाराच्या मुकादमालाही उचलुन नेले. आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यकर्त्यांनी तेथे जात त्या मुकादमाला परत आणले. पण प्रश्न तिथे संपला नाही. गावकऱ्यांचे म्हणणे आहे आपली हद्द अजून खूप पुढे आहे.कर्नाटक वनविभाग चुकीची हद्द दाखवत आहे. त्यांची हद्द जंगलात येते पण हद्दीचा दगड लावताना जंगलात जाणे टाळून कर्मचाऱ्यांनी आपल्याला सोयीस्कर ठिकाणीं रस्त्यालगत दगड लावून आमच्याच जमिनीत अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे कर्नाटक वनविभागाने दावा केलेली जमीन मांगेलीवासीयांच्या वहिवाटीत होती आणि ते त्या जमिनीत शेत पिकवायचे. असे असताना कर्नाटक वनविभाग दादागिरीने आमचे डांबरीकरण रोखत आहे. आमच्या पारंपारिक जमिनीत आपला हक्क सांगत आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी कर्नाटकातील सडा भागात वनक्षेत्राकडे जाणारा रस्ताच जमीन मालकांनी बंद केला आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कुडाळ*
*येथे “ग्रामीण करियर एजंट” नेमणे आहेत..!!!*
=======================
*वेतन मासिक ₹5000 + कमिशन + बोनस*
*शिवाय ग्रॅच्युटी, मेडिकल कव्हर, ग्रुप इन्शुरन्स अधिक भत्ते लागू*
=======================
*पात्रता-*
*कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील कोणत्याही ग्रामीण भागातील रहिवासी*
*शैक्षणिक अर्हता-*
*12 वी पास / पदवीधर*
=======================
*वयोमर्यादा-*
*खुला- 18 ते 35 वर्ष.*
*मागासवर्गीय-18 ते 40 वर्ष.*
=======================
*अर्ज करण्याची शेवटची तारीख*
*15/05/2022*
*लेखी परीक्षा व मुलाखत -*
*22/05/2022*
*ठिकाण -*
*कुडाळ LIC कार्यालय*
=======================
*वरील पात्रता धारक गरजू उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.. (जागा मर्यादित.)*
=======================
*उमेश गावडे*
*विकास अधिकारी,*
*भारतीय आयुर्विमा महामंडळ*
*मो. नंबर- 9421082622*
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️ *आपले Application आमच्याकडे आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

