मळगांव इंग्लिश स्कूलच्या एस.एस.सी.८८-८९ चा स्नेहमेळावा ठरला यादगार
*🟥मळगांव इंग्लिश स्कूलच्या एस.एस.सी.८८-८९ चा स्नेहमेळावा ठरला यादगार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी, दि १७ मे*
विविध गुणदर्शन कार्यक्रम मनोगत व जुन्या आठवणींना उजाळा
गुरुवर्य भागवत यांच्यासह माजी शिक्षकांकडून मौलिक मार्गदर्शन
मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवमधील एस. एस. सी. गृप १९८८ – ८९ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा “स्नेह मेळावा” रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी सादर केलेले विविध गुणदर्शन कार्यक्रम, मनोगते यामुळे जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. विशेषत: माजी मुख्याध्यापक गुरुवर्य भागवत सर व अन्य माजी शिक्षकांकडून मोलाचे मार्गदर्शन यामुळे हा स्नेहमेळावा यादगार ठरला.
मळगांव रेडकरवाडी येथील ‘ नरेंद्र सृष्टी ‘ या अत्यंत रमणीय व निसर्गरम्य तसेच कृषी पर्यटन स्थळ म्हणून प्रख्यात असलेल्या दिवाकर खानोलकर यांच्या रिसॉर्टवर संपन्न झालेल्या या मेळाव्यात गृप मधील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी आपल्या मनोगतांमधून आपली ओळख देतानाच वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
गुरुवर्य भागवत सर यांनी उत्तरार्धात सादर केलेली कथा सर्वांनाच भावली. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांच्यातील उर्जा सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरली. आपलं वय विसरून विद्याथ्यांसोबत मित्र बनून उपस्थित शिक्षकांनी विचार व अनुभवांची शिदोरी रिती केली. सुमारे ३३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या गुरु शिष्यांमधील संवादाने संबंध अधिकच दृढ झाले. आपापल्या आयुष्यातील व करिअर मधील चढ उतार यांचे अनुभव कथन करीत सर्वांचीच मने मोकळी झाली व पूढील आयुष्यासाठी नवी चेतना प्राप्त झाल्याचा भास झाला.
एस. एस. सी. नंतर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी- व्यवसायांनिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी व विद्यार्थीनी तब्बल ३३ वर्षानंतर या स्नेह मेळाव्यात एकत्र आले होते. मळगांव सहीत वेत्ये, नेमळे, निरवडे, सोनुर्ली या गावांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग असलेला हा मेळावा नियोजनबद्ध कार्यक्रम व सर्व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या नियोजनबद्ध संयोजना द्वारे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थी महेश खानोलकर, संतोष शिरोडकर, विद्यार्थी तथा पत्रकार सचिन रेडकर, विद्यार्थी तथा प्राध्यापक श्याम सोनुर्लेकर, विद्यार्थी तथा प्राध्यापक उदय सावळ तसेच विद्यार्थी गणेश सामंत, लिंगो डांगी, तुळसीदास नाईक, सतीश राऊळ, जयवंत केरकर, उदय फेंद्रे, संतोष सामंत, प्रमोद गवंडे, श्याम सावळ, प्रभाकर खडपकर, सिताराम गांवकर, अंकुश गांवकर, दिगंबर नाईक, प्रताप राऊळ, सुचित मोर्ये, संतोष सामंत, नागेश मळगांवकर तसेच दर्शना खानोलकर, गीता ठाकूर, मंगल खडपकर, सुवर्णा गांवकर, मीना पेडणेकर, माधवी सावळ, स्मिता रेडकर, प्रतिभा राणे, चारुलता महाले, कांचन धुरी, निता राणे, शुभांगी कांबळी, कमल राऊळ, मंदा तळकटकर आदी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.
विशेषतः यावेळी मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये तत्कालीन मुख्याध्यापक गुरुवर्य भागवत यांच्या संकल्पनेतून लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुपारच्या वेळी पेज देण्याची योजना १९८८-८९ मध्ये सुरु करण्यात आली होती. त्यावेळी आजच्यासारखी पोषण आहाराची व्यवस्था नव्हती. त्यामुळे वाटगं भर पेज व लोणचं खाऊन विद्यार्थी दिवस भर शाळेत राहायचे. पालकांच्या मदतीने व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली होती. त्याचीच आठवण म्हणून स्नेहा मेळाव्याच्या अल्पोपहारात खास उकड्या तांदूळांची पेज व फणसाची भाजी असा फक्कड बेत केला होता. विशेष म्हणजे गुरुवर्यांसह इतर सर्वच विद्यार्थ्यांनी त्यावर यथेच्छ ताव मारला. अल्पोपहासह दुपारचं स्वादिष्ट जेवण, आईस्क्रीम व केक अशा मेजवानीने या मेळाव्यात अधिकच गोडी वाढली.तर गुरुवर्यांच्या उपस्थितीने मेळाव्यात अधिकच रंगत आणली.मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य भागवत सर यांच्यासह माजी मुख्याध्यापक शशिकांत साळगावकर, बाळकृष्ण मुळीक, दिवाकर राऊळ, वैजनाथ देवण, सामंत सर, भिसे सर तसेच विद्यमान मुख्याध्यापिका प्रमिला राणे – सावंत यांच्या स्नेहा मेळाव्यातील उपस्थितीमुळे मौलिक मार्गदर्शनाबरोबरच मेळाव्याची रंगत अधिकच वाढली. वयाच्या ८९ व्या वर्षी भागवत सर डॉक्टरेट करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. यातून आमचं वय आता वाढला आहे असं वाटणाऱ्या उपस्थित माजी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. इतर शिक्षकांनीही मोलाचे मार्गदर्शन करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यातून विद्यार्थी व शिक्षकांच्या अनुभवांचे आदान-प्रदान झाल्याने मनही मोकळी झाली. आयुष्याचा आनंद कसा घ्यावा याचे मौलिक मार्गदर्शन या वेळी उपस्थित शिक्षकांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🏝️ माधवबाग🩺*
👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….
*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*
*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२
*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६
हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल
*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*
🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी
*📱संपर्क:*
*कणकवली -*📱9373183888
*कुडाळ-📱* 9011328581
*सावंतवाडी-*📱7774028185
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

