पंधरा राज्यातील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला निवडणूक
*🟥 पंधरा राज्यातील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला निवडणूक*
*🟥अकाली दलाचे राज्यसभेतील अस्तित्व संपुष्टात येण्याची आणि भाजपचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नवी दिल्ली.:१३ मे*
नवी दिल्ली : पंधरा राज्यांतील
राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली. अकाली दलाचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व संपुष्टात येण्याची आणि अलीकडेच शंभर सदस्यांचा आकडा गाठणाऱ्या भाजपचे संख्याबळही कमी होण्याची शक्यता आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यांत वेगवेगळ्या तारखेला सदस्य निवृत्त होत असल्याने या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. अधिसूचना २४ मे रोजी जारी करण्यात येणार असून, १० जून रोजी मतदान घेतले जाईल.
निवृत्त होणाऱ्या प्रमुख सदस्यांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी, अंबिका सोनी, जयराम रमेश, कपिल सिब्बल (काँग्रेस) आणि बसपचे सतीश चंद्र मिश्रा यांचा समावेश आहे. २१ जून आणि १ ऑगस्टदरम्यान हे सदस्य निवृत्त होणार आहेत. २४५ सदस्य असलेल्या राज्यसभेत भाजपचे सध्या ९५ सदस्य असून, काँग्रेसचे २९ आहेत.
उत्तर प्रदेशचे ११, महाराष्ट्र आणि तमिळनाडूचे प्रत्येकी ६ आणि आंध्र प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकचे प्रत्येकी ४ सदस्य निवृत्त होत आहेत. मध्य प्रदेश आणि ओडिशाचे प्रत्येकी ३ तसेच तेलंगणा, छत्तीसगढ, पंजाब, झारखंड ३ आणि हरयाणाचे प्रत्येकी २ आणि उत्तराखंडचे एक सदस्यानिवृत्त होत आहेत.
भाजपला आंध्र प्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये हादरा बसू शकतो. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून याची भरपाई होण्याची भाजपला आशा आहे. आंध्र प्रदेशातील भाजपच्या तीन सदस्यांचीही मुदत संपत आहे. पंजाबचे अकाली दलाचे एकमेव सदस्य बलविंदर सिंग, काँग्रेसच्या अंबिका सोनी यांच्या रिक्त होणारी जागा आम आदमी पार्टीचे सदस्य घेऊ शकतात. कारण पंजाब विधानसभेतील प्रचंड संख्याबळ पाहता आम आदमी पार्टी या दोन्ही जागा जिंकू शकते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🏝️ माधवबाग🩺*
👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….
*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*
*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२
*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६
हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल
*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*
🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी
*📱संपर्क:*
*कणकवली -*📱9373183888
*कुडाळ-📱* 9011328581
*सावंतवाडी-*📱7774028185
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

