आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगाव घाटीत साईडपट्टीमुळे सायकलस्वार अपघातात गंभीर जखमी

*🟥मळगाव घाटीत साईडपट्टीमुळे सायकलस्वार अपघातात गंभीर जखमी*

*🟥रस्त्याची साईडपट्टी बांधावी अशी मळगांव व माजगांव वासियांसहीत पंचक्रोशीतील वाहन चालक, दुचाकी स्वार यांची मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴 सावंतवाडी, दि.:११ मे*
रस्त्याच्या कडेला असलेल्या साईडपट्टीमुळे झालेल्या अपघातात सायकलस्वार जखमी होण्याची घटना बुधवारी घडली.सावंतवाडी रेडी राज्यमार्गावर मळगांव घाटीत डि. के. टुरिझम जवळ हा अपघात झाला.या अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव दिलीप म्हापसेकर असे आहे. या जखमी युवकाला भाजपा पदाधिकारी संदिप कुडतरकर, डि.के.सावंत व अन्य ग्रामस्थांनी त्यांना त्वरित उपचारार्थ येथील रुग्णालयात दाखल केले.
सावंतवाडी येथील एल.आय.सी. अधिकारी दिलीप म्हापसेकर हे नेहमीप्रमाणेच आपल्या सायकलवरुन सकाळची रपेट मारत असताना मळगांव घाटीलगत रस्त्याच्या बाजूला मुख्य रस्ता व साईडपट्टी यात जास्त अंतर असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात सायकल रस्त्यालगत चरात जाऊन खाली पडले. या अपघातात सायकलचे अक्षरश: दोन तुकडे होऊन म्हापसेकर हे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर बेशुद्ध पडले. यावेळी त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असूनही डोक्याला मार लागला. ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले.दरम्यान याचवेळी तेथून जाणाऱ्या संदिप कुडतरकर यांनी त्यांना पाहताच अन्य सहकाऱ्यांच्या साथीने त्वरित रुग्णालयात दाखल केले.यावेळी विजय बिरोडकर, शिरीष राऊत,मारुती सावंत, यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णाचे जीव वाचविण्यात मदत झाली.
वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादात अपघातांना निमंत्रण ठरत असल्याचे या अपघातामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया डि. के. सावंत यांनी व्यक्त केली आहे. सावंतवाडी रेडी हा राज्यमार्ग आहे. अलिकडेच त्याचे नुतनीकरण झाले होते. मात्र रस्त्याला आवश्यक अशी साईडपट्टी नसल्यामुळे या घाटीत असे अपघात वारंवार होत आहेत. वनविभागाच्या ताठर भूमिकेमुळे येथे रुंदीकरण करता येत नाही,असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकारचे अपघात होत असल्याने याबाबत डि.के. सावंत संदिप कुडतरकर, व अन्य सहकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून लवकर या रस्त्याची साईडपट्टी बांधावी अशी मागणी मळगांव, माजगांव व पंचक्रोशीतील वाहन चालक, दुचाकी स्वार, सायकल स्वार यांनी केली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!