ज्या लोकांना आंबोली गावाशी देणे घेणे नाही त्यांनी घाट बंद करण्यासाठी निवेदन देऊ नयेत-बाळा पालेकर
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी, दि६मे.:*
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आंबोली घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करावा असे निवेदन दिले या निवेदनावर आंबोली सरपंच बाळा पालेकर यांनी आक्षेप घेतला असून ज्यांचे आंबोली गावाशी काहीच देणे घेणे नाही किंवा घाट बंद झाल्यावर होणाऱ्या परिणामांची ज्यांना चिंता नाही अशा लोकांनी घाट बंद करण्याचे निवेदन देण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे आंबोली घाट दुरुस्तीकामात होणारा भ्रष्टाचार तसेच आंबोली येथे वनविभागात होणारा भ्रष्टाचार या विषयावर आवाज उठवावा. राज्य मार्ग किती दिवस बंद ठेवता येतो? याची माहिती घ्यावी त्याचप्रमाणे यापूर्वी दोन ते तीन वेळा घाटमार्ग कोसळलेला त्या वेळी सार्वजनिक बांधकामने काम करण्यासाठी उगाच वेळ काढू धोरण राबवले. त्यामुळे स्थानिकांचे, संपूर्ण जिल्ह्याचे इतर राज्यातील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच आंबोली घाट अवजड वाहनांसाठी बंद कशासाठी ठेवण्यात आला? याची माहिती ह्या राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी व संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारावा. तसेच स्थानिक लोकांना विचारात घेऊन घाटातील वाहतूक बंद करावी. अन्यथा आंबोली गावातील व्यापाऱ्यांचे व हॉटेल व्यावसायिकांचे होणारे नुकसान याचा विचार संबधित निवेदन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी करावा. राज्यात आपलं सरकार आहे त्यामुळे रस्ता बंद ठेवण्याऐवजी दुरूस्तीसाठी निधी मंजूर करावा. घाट बंद स्थितीत ठेवण्यासाठी राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस खाते यांचे सूद्धा हात बरबटले आहेत. याच्या बद्दल माहिती घेऊन मग घाट बंद बंद करण्याची भाषा करा.अन्यथा स्थानिक लोकांचा रोश पत्करावा लागेल असे बाळा पालेकर यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_