वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या प्रकरणातील ७ जणांच्या जामीन अर्जावर येत्या २९ एप्रिल रोजी सुनावणी
*🟥वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या प्रकरणातील ७ जणांच्या जामीन अर्जावर येत्या २९ एप्रिल रोजी सुनावणी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.२८ एप्रिल*
सावंतवाडी,दि.२७ एप्रिल (प्रतिनिधी)
लोडशेडींग केल्यानंतर लोक जाब विचारायला गेलेल्यांनी अधिकारी व सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्या प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या ७ जणांच्या जामीन अर्जावर येत्या दि.२९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील आणखी दोन पोलिसांना मिळाले नाहीत असे पोलिसांनी सांगितले.
लोडशेडिंगच्या वादातून विज अधिकारी आनंद गावडे व सुरक्षा रक्षक चौरंग सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ७ जणांना पोलिसांनी अटक केली असून दोघे जण अद्याप आढळून आले नाहीत त्यात एक पत्रकार आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या केतन आजगावकर, अमित गवंडळकर, अरूण भिसे, मृणाल उर्फ मुन्ना मुद्राळे, शौकत शेख, अमित वेंगुर्लेकर व प्रणेश बिद्रे यांनी जामीनसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुनावणी येत्या दि.२९ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २० एप्रिलला मध्यरात्री वीज वितरणने अचानक नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता भारनियमन केले होते. रात्री ११.३० ते ३ वाजेपर्यंत वीज खंडित करण्यात आली होती. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जाब विचारण्यासाठी येथील विद्युत वितरणच्या कार्यालयावर धडक दिली होती. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद आल्यामुळे नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. यावेळी त्यांनी कोलगाव उपकेंद्रात जाऊन त्या ठिकाणच्या अधिकारी व कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली होती. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा करून मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया आजही सुरू आहे.
या प्रकरणातील पत्रकार विनायक गावस व श्री. वंजारी या दोघांची पोलीसांना प्रतिक्षा आहे. पत्रकार विनायक गावस यांचे नाव वगळण्याची मागणी पत्रकार संघाने केली आहे. मात्र पोलिसांनी नाव वगळण्याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_