सिंधुदुर्ग जिल्ह्याला अमली पदार्थांचा घट्ट विळखा, कॉलेज युवक -युवतींना हेरुन पाडले जाते फशी
*🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्याला अमली पदार्थांचा घट्ट विळखा, कॉलेज युवक -युवतींना हेरुन पाडले जाते फशी*
*🟥 शिक्षणाच्या निमित्ताने खाजगी हाॅस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तपासणीची खरी गरज*
*🟥 व्यसनाच्या आहारी जाऊन नैराश्य पोटी आत्महत्या करणाऱ्यां युवकांची संख्या वाढती*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 स़पादकीय : सीताराम गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:२३ एप्रिल*
सिंधुदुर्ग जिल्हा सध्या अफू, चरस, गांजा ,या अमली पदार्थांनी घट्ट विळखा घातला आहे हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची गरज भासणार नाही ,अमली पदार्थांचा विळखा आता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही व या अंमली पदार्थांच्या विळख्या मुळेच आत्महत्येचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे, कुटुंबाचा एकुलता एक वंशाचा दिवा जेव्हा या अमली पदार्थांच्या आहारी जातो, व्यसनाधीन बनतो आणि घरच्यांना न जुमानता त्यांचा विचार न करता नैराश्य पोटी आत्महत्या करतो तेव्हा घरच्यांच्या वेदना असह्य असतात, त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असतो, त्यावेळी असा एकच विचार मनात येतो काय ही प्रगती झाली, पूर्वीचा जमान्यातील माणसे सुखाने ,समाधानाने ,भाजी भाकरी खाऊन जे दिवस काढत होती निसर्गाशी एकरूप होत होती तेच खरे जीवन होते. माणुसकी हरवत चाललेले या जगात कर लो दुनिया मुठ्ठी में असे म्हणत जेव्हा मोबाईल हातात पडला तेव्हा होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागला नाही. मोबाईल मधून जेवढ्या चांगल्या गोष्टी मिळतात त्याच्या कैक पटीने वाईट गोष्टींचे मुले अनुकरण करतात हे दिसून आले आहे, या सुंदर वाडीत निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत चुकीच्या गोष्टी घडत नव्हत्या मात्र गेल्या दहा वर्षाच्या कालखंडापासून वेगवेगळ्या प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थ येऊ लागलेत गोवा जवळ असल्यामुळे त्याचा परिणाम झाला हे जरी खरे असले तरी केरळीयनच्या बागा तिथे पिकणारा गांजा किंवा गुजरात वरून येणारे अंमली पदार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ लागले आहेत व यांचे मूळ ठिकाण महाविद्यालय, इंजिनीरिंग कॉलेज, जुनियर कॉलेज, यामध्ये शिकणारे विद्यार्थी वयात आलेल्या मुलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडं अशाप्रकारचे दुष्कृत्य करून घेतले जाते, परिणामी मूले ही त्या नशेच्या आहारी जातात व आपले जीवन संपून घेतात. आज-काल प्रत्येक आई-वडिलांना आपला मुलगा चांगल्या कॉलेजमध्ये शिकवा ,चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असावा अशी इच्छा असते ,त्यासाठी रक्ताचे पाणी करुन आईवडील आपल्या मुलांना चांगल्या इंजिनीरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज मध्ये घालतात मात्र ही मुले कधीच कॉलेजच्या वसतिगृहात राहायला बघत नाहीत ते खाजगी ठिकाणी राहणे पसंत करतात यामागचे गुपित काय असा प्रश्न खर तर आई-वडिलांना पडायला पाहिजे मात्र मुलांवर अति विश्वास असल्याने कॉलेजच्या होस्टेलमध्ये जेवण चांगलं मिळत नाही, गाद्या चांगल्या नाहीत ,फॅन चालत नाही अशी चुकीची कारणे देऊन आई-वडिलांची दिशाभूल करून खाजगी लोकांकडे ही मुले राहतात त्या ठिकाणी या मुलांना हवे ते करू दिले जाते ,मौज, मजा करता येते रात्री-अपरात्री फिरायला जायला त्यांच्यावर कोणाचीच बधने नसतात हे आई-वडिलांना समजत नाही व याच ठिकाणी आई-वडील चुकतात आणि मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी होते.
. आपला मुलगा काय करतो, कुठे राहतो, सभोवतालचे वातावरण कसे आहे, ज्यांच्याकडे आपला मुलगा ठेवला आहे ही माणसे कशी आहेत ,त्या ठिकाणी मुले किती आहेत, शेजारी कोणती मुले राहतात, मुलींना ठेवून घेतले जाते त्या ठिकाणचे वातावरण कसे आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोण जबाबदार व्यक्ती आहे की नाही, याचा विचार कधीच आईवडील करत नाहीत,लाखो रुपये खर्चून आपण आपल्या मुलांचे भवितव्य घडवायला एखाद्या चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलांना घालतो मात्र मुलांच्या हट्टापायी मुलांना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये न ठेवता खाजगी हाॅस्टेल चालवणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आपली मुले स्वाधीन केली जातात मात्र त्या खाजगी व्यक्तीला फक्त पैसा हाच उद्देश असतो ,तुमच्या मुलाने बाकी काही करू देत त्याने हवी ती मजा करू देत त्याच्याशी त्या खाजगी हॉस्टेल चालकाचा काही देणे घेणे नसतं हे पालक सोयीस्कर विसरतात .त्यामुळे पालकांनी मुलाने कितीही हट्ट केला तरी ज्याठिकाणी मुलगा शिकतो त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली तर मुले वाममार्गाला लागण्याच्या प्रकाराला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आळा बसेल असे आमचे ठाम मत आहे.
. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास केला असता अनेक ठिकाणच्या विविध कॉलेजमध्ये शिकणारी मुलं कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहत नाहीत ,हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच मुलं कॉलेजच्या हॉस्टेलवर राहतात यासाठी आम्ही काही हॉस्टेलवर भेट दिली ,त्या ठिकाणच्या सोयी-सुविधाही पहिल्यात त्या सोयीसुविधा खरंतर एक नंबर होत्या जेवणही चांगलं असतं, केवळ आणि केवळ आपल्याला मौजमजा करायला मिळायला पाहिजे यासाठी आई-वडीलांना चुकीची माहिती देऊन ही मुले बाहेर राहणे पसंत करतात व येथेच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतात.आज अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेली मुले आत्महत्या करण्याचे प्रकार घडत आहेत या आत्महत्येचे खरे कारण जर पाहिले तर एक तर्फी प्रेम ,व्यसनाच्या आहारी जाणे, गांजा चरस ,सिगारेट ओढणे हे प्रकार वाढू लागले आहेत व हे सर्व करायला मिळाल्या पाहिजे म्हणूनच आई-वडिलांना चुकीची माहिती देऊन मुले बाहेर राहणे पसंत करतात व अशी मुले एखाद्या प्रकरणात अडकली कि ती मुले ज्या महाविद्यालयात शिकतात त्या कॉलेजचे नाव बदनाम होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाकीचा धाक हवा तसा राहीलेला दिसत नाही ड्रक्स ,अमली पदार्थ ,गांजा चरस,हवा तेव्हा हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होतो हे खाकी खात्यातील कर्मचारी अधिकाऱ्यांना याबाबतची सर्व माहिती असते मात्र ते मूग गिळून गप्प राहतात, कारण त्यांचे हात ओले झालेले असता,त अवैद्य दारू तर काय विचारायलाच नको आज सोळा सतरा, अठरा ,वर्षाची मुले रस्त्याच्या कडेला उभी राहून बियर पितानाचे चित्र पाहायला मिळते हे कशाचे धोतक आहे.
आज वेगवेगळ्या ची प्रकारची दारू खाजगी हाॅस्टेलमध्ये पुरवली जाते व त्या ठिकाणी हाणामारीचे प्रकार घडतात हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, पोलिसांनी ज्या ठिकाणी अशा प्रकारची अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत आणि त्यांची हॉस्टेल आहेत आणि जे कोण आजूबाजूच्या परिसरात खाजगी हाॅस्टेल चालवतात त्यांची सर्व तपासणी करणे गरजेचे आहे, त्या मुलांच्या रूम जाऊन पाहणी करणे गरजेचे आहे, संबंधित हाॅस्टेल चालवणाऱ्या व्यवसायिकाकडे कोणत्या प्रकारची परवानगी आहेत फूड लायसन आहे का ?हाॅस्टेल चालविण्याचे लायसन आहे का? या प्रकारच्या तपासण्या करणे गरजेचे आहे असे आमचे ठाम मत आहे. कारन याची सुरुवात अशाच ठिकाणाहून होते व अशाच वयात आलेल्या मुलांना हेरले जाते या निष्कर्षापर्यंत आम्ही पोचलो आहोत.
भविष्यात याबाबत मोठा लढा उभारावा लागेल यात शंका नाही,कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय हे लोन उद्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने आता सावध व्हायला पाहिजे ,एकदा आपली मुले नशेच्या आहारी गेली व नशेची चटक लागली की त्यातून त्यांना बाहेर काढणे शक्य नाही,ही अशी मुले पालकांना ही जुमानणार नाहीत, पालकांच्या प्रसंगी अंगावरचे धावुन जातील, त्यामुळे पालकांनी आत्ताच कठोर पावले उचलून आपली मुले काय करतात? ती कुठे राहतात ?कशी राहतात?याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते. हे असे होईल त्यावेळी अशा पदार्थांच्या सेवनानेला ,दारूच्या सेवनाला ,मोठ्या प्रमाणात चाप बसेल असे आम्हाला वाटते,यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे, पोलीस प्रशासनाने आपल्या हद्दीतील ज्या ठिकाणी अशा प्रकारची अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत त्या ठिकाणच्या परिसरात राहणारी मुले, त्यांच्या रुम ची झडती घेऊन ,पाहणी करणे गरजेचे आहे, तसेच संबंधित मालकाकडे कोण-कोणत्या प्रकारची लायसन्स आहेत, त्याठिकाणी मुलांवर देखरेख ठेवण्यासाठी कोणाची नेमणूक केली आहे? याबाबतची माहिती घेऊन संबंधित रेकॉर्ड तयार करणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते, ज्यावेळी असे घडेल त्यावेळी या गोष्टीला बर्याच मोठ्या प्रमाणात आळा बसेल.याबाबत उठाव करण्याची गरज आहे वेळ प्रसंगी आम्ही तोही करू हे ही या निमित्ताने सांगू इच्छितो.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

