शाळा पूर्व तयारी” हा कोरोना लाॅकडाऊन नंतरचा पहिला मेळावा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मळगांव सावळवाडा येथे संपन्न
*🟥शाळा पूर्व तयारी” हा कोरोना लाॅकडाऊन नंतरचा पहिला मेळावा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मळगांव सावळवाडा येथे संपन्न*.
*🟥विद्यार्थी-विद्यार्थीनींतर्फे माहिती दर्शक स्टाॅल लावून उपस्थित विद्यार्थी व पालक यांना सविस्तर व उपयुक्त माहिती*.
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी, दि.२० एप्रिल:*
“शाळा पूर्व तयारी” हा कोरोना लाॅकडाऊन नंतरचा पहिला मेळावा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मळगाव सावळवाडा येथे विद्यार्थी- विद्यार्थीनी, पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी या उपक्रमांतर्गत प्रथम दाखलपात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींना विविध माहिती दर्शक स्टाॅल लावून उपस्थित विद्यार्थी व पालक यांना सविस्तर व उपयुक्त माहिती विद्यार्थी-विद्यार्थीनीं मार्फत देण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा चित्रपट आघाडी समितीचे शेखर म. पाडगावकर, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा चे पदाधिकारी तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित समाजसेवक चंद्रकांत भोजू जाधव,मळगांव ग्रामपंचायत सदस्या निकिता निळकंठ बुगडे व रत्नप्रभा आपा तळकटकर, सावळवाडा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा दिव्या लक्ष्मण तळकटकर, माजी अध्यक्ष पांडुरंग वसंत बुगडे, पत्रकार कोकण लाईव्ह सुखदेव राऊळ आदी उपस्थित होते.
या मेळाव्यावेळी “नोंदणी” या स्टाॅलची माहिती कु. पुर्वा मिलिंद तळकटकर हिने, “शारीरिक विकास क्षमता” या स्टाॅलची माहिती कु. गणेश सुभाष नाईक याने, बौद्धिक विकास क्षमता या स्टाॅलची माहिती कु. विघ्नेश रामा तळकटकर याने सामाजिक आणि भावनात्मक विकास क्षमता या स्टाॅलची माहिती कु. सेजल केशव पेडणेकर हिने, भाषा विकास क्षमता या स्टाॅलची माहिती कु. करिष्मा प्रकाश सावळ, गणनपूर्व तयारी स्टाॅलची माहिती कु. गौतमी जयानंद हरमलकर हिने व पालकांना उपक्रम साहित्य वाटप व मार्गदर्शन स्टाॅलची माहिती कु. विघ्नेश नरेश सावंत या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी करुन दिली.
यावेळी संजना देवदास गवंडे, प्रणिता परशुराम गवंडे, लक्ष्मी नारायण सावळ, पूर्वा जयानंद हरमलकर, सरीता धोंडी सावळ, रिया हनुमंत हरमलकर, शुभांगी विष्णू सावळ, मानवी महादेव हरमलकर, समिक्षा सहदेव सावंत, विनीता पांडुरंग बुगडे, मिलन न्हानू सावळ आदी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका श्रीम. पुजा गजानन मुळीक, शाळेचे शिक्षक श्री.प्रविण न्हानू देसाई, श्रीम. मनाली महेंद्र कोरगांवकर, श्री. सागर सदानंद खटावकर यांनी मेहनत घेतली. यावेळी शेखर पाडगावकर व चंद्रकांत जाधव, सौ. गवंडे व शिक्षिका श्रीम. मनाली कोरगावकर यांनी उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थीनी व पालक यांना मार्गदर्शन केले. हा संपूर्ण कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्तपणे पार पडला.दरम्यान यावेळी इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांच्या नोंद करणे तसेच इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांना शाळा पूर्वतयारी करणे व मार्गदर्शन, समुपदेशन आदी कार्यक्रम संपन्न झाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

