कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी यांचे पुरस्कार जाहीर

*🟥 ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी यांचे पुरस्कार जाहीर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:१८ एप्रिल*
ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीचे दरवर्षी प्रमाणे देण्यात येणारे सन २०२१ व सन २०२२ चे जिल्हास्तरीय मानाचे
पुरस्कार रविवारी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारीता, कला, संगीत, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जाहीर करण्यात आले आहेत.
प्राप्त झालेल्या प्रस्तावात संस्थेचे खजिनदार एस. आर. मांगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ज्ञानदीप पुरस्कार निवड समितीमधून खालील व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. ही संस्था गेली १६ वर्षे कार्यरत असून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित करते.
यात शिवराम गणेश जोशी माणगाव- कुडाळ यांची सहकार, देशप्रेम, सामाजिक कार्यासाठी निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट अंगणवाडी शिक्षिका म्हणून हेमा हरिश्चंद्र नाईक, मोरगाव – दोडामार्ग, कला संगीत क्षेत्रातील कार्यासाठी महेश लवू कांडरकर तळवडे-सावंतवाडी, उत्कृष्ट शिक्षकेत्तर कार्यकर्ता म्हणून सुनिल शांताराम नाईक, तुळसुली-कुडाळ, शैक्षणिक व‌ ग्राहक चळवळ कार्यकर्ता पुरस्कारासाठी प्रा‌. सुरेश नारायण पाटील, वैभववाडी यांची निवड करण्यात आली आहे. तर उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी सुर्यकांत सांगेलकर बांदा- सावंतवाडी, डिजिटल पत्रकारितेतील योगदानासाठी सागर दत्ताराम चव्हाण सावंतवाडी, उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी शामल शंकर मांजरेकर-वेंगुर्ला, उत्कृष्ट शैक्षणिक संशोधन कार्यासाठी अनुष्का नागेश कदम-मालवण यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेत.
या पुरस्कारांची निवड संस्थापक वाय.पी.नाईक, अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गांवस, विठ्ठल कदम, प्रा. रूपेश पाटील या समितीने केली. या बैठकीत ज्ञानदीपशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे या संस्थेचे लेखापरीक्षक विजय सावंत-मळगाव व ओमकार प्रिंटिंग प्रेस मळगावचे गंगाराम निगूडकर यांचं नुकतंच निधन झाल्यानं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!