आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५ नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणीला मंजुरी
🟥आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५ नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणीला मंजुरी
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि.:१७- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कडून मान. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ग्रामपंचायत इमारत बांधणीला मंजुरी मिळाली आहे. त्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पाच ग्रामपंचायतींची इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांचा सतत पाठपुरावा होता, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.
माजी पालकमंत्री,आमदार दीपक केसरकर त्यांचा सततचा पाठपुरावा आणि खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारत बांधणीला मंजुरी मिळाली आहे असे श्री राऊळ म्हणाले.
सावंतवाडी तालुक्यात सातार्डा,ओवळीये , दोडामार्ग तालुक्यात मोरगाव व फुकेरी आणि वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणी योजनेतून मंजुरी मिळाली आहे. या नव्या ग्रामपंचायती एका वर्षात बांधकाम पूर्ण होऊन पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायत इमारत बांधणीला मंजुरी मिळाली आहे त्यासाठी माजी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर यांचा सततचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️
*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻💼👩🏻💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*
🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.
*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.
Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

