सावंतवाडी तेरेखोल नदी पात्रातील गाळ काढण्याबाबत च्या हालचाली झाल्या सुरू

🟥सावंतवाडी तेरेखोल नदी पात्रातील गाळ काढण्याबाबत च्या हालचाली झाल्या सुरू

🟥पाटबंधारे विभागाकडून माडखोल येथील नदी पात्राचे मोजमाप

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि.१६: तालुक्यातील तेरेखोल नदी पात्रातील गाळ काढण्याबाबत च्या हालचाली सुरू झाल्या असून पाटबंधारे विभागाकडून माडखोल येथील नदी पात्राचे मोजमाप हाती घेण्यात आले आहे. याबाबत अहवाल पाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर गाळ काढण्याबाबत पाऊल उचलण्यात येणार आहे.
सावंतवाडी तालुक्यातून वाहणाऱ्या तेरेखोल नदीचे पात्र गाळाने भरल्याने
पावसाळ्यात नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसतो या नदीकाठच्या नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते यावर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये तेरेखोल नदी पात्राला लागून असलेल्या माडखोल, इन्सुली, ओटवणे, बांदा, सरमळे, शेर्ले आधी गावातील नागरिकांचे न भरून येणारे नुकसान झाले काहींची घरे कोसळली तर काहींचे जीवनावश्यक सामान वाहून गेले, महापुरा मध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले संपूर्ण कोकणातच महापुराचा फटका नदीकाठच्या गावांना सहन करावा लागला होता त्या वेळेची घटना आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत भविष्यात यातून मार्ग काढण्यासाठी नदी पात्रातील गाळ उपसा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज लघु पाटबंधारे विभागाच्या सावंतवाडी चराटा येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून माडखोल गावातील नदी पत्राचे मोजमाप काम हाती घेतले.
मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नदी पात्रातील गाळ काढण्यास संदर्भात हिरवा कंदील दाखवल्यानंतर आजपर्यत काहीच हालचाली होत नसल्याने माडखोल येथील माजी सरपंच संजय लाड यांनी ग्रामस्थांच्या सहीनिशी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत 31 एप्रिल पूर्वी नदीपात्रातील काळ उपसा करण्याचे काम हाती घ्या अन्यथा 1 मे ला तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तर तेरेखोल नदीकाठी राहणार्‍या नागरिकांकडूनही गाळ काढण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. याचीच दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हालचालींना वेग आला आहे.
माडखोल गावातून वाढणाऱ्या तेरेखोल नदीची एकूण लांबी हे जवळपास तीन किलोमीटर अंतराचे आहेत याठिकाणी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून नदीपात्रात झाडेझुडपे वाढली आहेत. गेली कित्येक वर्षापासून येथील नागरिकांनी नदीपात्रातील गाळ काढण्याची मागणी प्रशासकडे लावून धरली होती. नदीपात्रात गाळ साचल्याने नदीपात्र रुंदावत चालले असून नजिकच्या घरांना याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नदीपात्रातील गाळ काढल्यास हा धोका कमी होणार असे तेथील ग्रामस्थाचे म्हणणे आहे.
चराठा येथील लघू पाटबंधारे उपविभागीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्याच्या टिम कडून नदिपात्राचे मोजमाप बुधवार पासून हाती घेण्यात आले आहे, यावेळी माडखोल माजी सरपंच संजय लाड, गुंडू राऊळ,जॅकी डिसोझा, विजय राऊळ, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!