कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

.रेडी पोर्ट मध्ये कामगारांचे नुकसान करणारी टेंडर पद्धत कशामुळे आणि कोणामुळे आणली गेली-संदेश पारकर यांचा वरीष्ठ अधिकारी बी,एस शेणाॅय यांना सवाल

*🟥.रेडी पोर्ट मध्ये कामगारांचे नुकसान करणारी टेंडर पद्धत कशामुळे आणि कोणामुळे आणली गेली-संदेश पारकर यांचा वरीष्ठ अधिकारी बी,एस शेणाॅय यांना सवाल*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.:२ एप्रिल*
रेडी बंदरात नांगरलेल्या मालवाहू जहाजात लोह खनिज लोडींग करण्याच्या कामात गेल्या तेरा वर्षात टेंडर वगैरे पद्धत नव्हती कामगारांचे नुकसान करणारी टेंडर पद्धत कशामुळे आणि कोणामुळे आणली गेली असा प्रश्न करत शिवसेनेचे ज्येष्ठ कामगार नेते संदेश पारकर यांनी रेडी बंदरच्या कामगारांच्या वतीने रेडी बंदरचे वरिष्ठ अधिकारी बी एस शेणाॅय यांच्याशी चर्चा करत उपस्थित केला.

रेडी बंदर टेंडर पद्धत कशामुळे आणि कोणामुळे आणली गेली असा प्रश्न करत स्पर्धात्मक पद्धत बंद करा. पूर्वीप्रमाणेच रोटी काम पद्धत चालू ठेवा त्याप्रमाणे महत्त्वाचे म्हणणे निर्यात हंगामात जीवावर उदार होऊन वर समुद्रात आठ महिने काम करणाऱ्या कामगारांना पावसाळ्याचे चार महिने बेकार स्वरूपात घरी बसून ऐवजी रेडी पोर्ट चे कामगार मानून मायनिंग विभागाप्रमाणे निदान अर्धा पगार द्यावा अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ कामगार नेते संदेश पारकर यांनी रिपोर्ट चे वरिष्ठ अधिकारी बी एस शेणाॅय यांच्याकडे केली.आपली सूचना चांगली आहे. आपले म्हणणे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू अशी ग्वाही श्री. शेणाॅय यांनी दिली.
रेडी बंदरातून चालू निर्यात हंगामात टेंडर पद्धत सुरू झाली त्यामुळे सोळा कामगारांना रोजगारापासून वंचित राहावे लागले याकडे कामगार नेते श्री संदेश पारकर यांनी यांचे लक्ष वेधले आणि या स्थानिक कामगारांचे म्हणणे अनुषंगाने पारकर यांनी शुक्रवारी सायंकाळी रेडी पोस्ट ऑफिस मध्ये श्री शेणाॅय यांच्याशी कामगार प्रतिनिधीचे कंत्राटदार आदींशी चर्चा केली.
सुरुवातीला कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर परवानगी देण्यास उशीर झाला म्हणून श्री. पारकर यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाजूला करून आत मध्ये प्रवेश मिळविला त्यानंतर कार्यालयात काही मुद्द्यावर संदेश पारकर आणि श्री. शेणाॅय यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी कंत्राटदार जगदीश गवंडी, दत्तगुरु भगत आदींनी वस्तुस्थिती समजावून सांगितली. यावेळी ही टेंडर पद्धत स्थानिकांचे नुकसान करणारी आहे हे लक्षात येताच श्री. पारकर यांनी शेणाॅय यांच्याकडे तोडगा मांडला यानंतर श्री देव घंगाळ या जागृत देवस्थान भागात कामगार कंत्राटदार व आदीची खास बैठक झाली. ठरल्याप्रमाणे सोळा कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे द्यावेत अशी मागणी पारकर यांनी केली.
यानंतर दत्तगुरु भगत, जगदीश गवंडे यांनी मुळात तीन लाख रुपये नुकसान झालेले आहे पूर्ण हिशोब झाल्यावर विचार करू असे सांगितले. चालू वर्षीच्या नवीन पद्धतीमुळे कामगार कंत्राटदार आदींचे नुकसान होत आहे कामगार नियमाप्रमाणे बंद काळात कामगारांना पावसाळी बंद सुविधा द्याव्यात,बंद काळात अर्धा पगार मिळावा आदी संदर्भात मुंबईत कामगार मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत अशी मागणी करण्याचे आश्वासन यावेळी संदेश पारकर यांनी दिले.
यावेळी उपसरपंच नामदेव राणे, अवधूत मालंडकर, न्हानू नागोळकर, संदीप भोसले, संतोष मांजरेकर, दत्तगुरु भगत, जगदीश गवंडी, महेश नाईक, अर्जुन शिरोडकर, प्रभाकर मांमलेकर, निलेश शिरोडकर, वामन कांबळे, प्रीतम मांजरेकर, गणेश भगत, दिनेश बुगडे ,संदीप बुडजी, रुपेश सूर्याजी, प्रसाद सूर्याजी, लवेश हुले, अविनाश हुले आदी उपस्थित होते
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*_सायकल उत्सव… 🎉सायकल उत्सव…🎉सायकल उत्सव…🎉_*
*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*

🎀२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ 🎀

पेडणेकर सायकल कंपनी सावंतवाडी, घेवून आले आहे ७० व्या वर्षानिमित्त
*_🚴‍♀️भव्य सायकल महोत्सव🚴‍♀️_*
_🪔उत्सव मराठी अस्मितेचा उत्सव गुढीपाडव्याचा_
_🌳पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा दिवस संस्कृती जपण्याचा._
🏃‍♀चला तर मग ..नववर्षारंभ करूया नवीन सायकल खरेदी करूया..🚴‍♀️

● जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल व स्पेअर पार्ट ,एसेसरीज, मिळण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण.

*_~~🚴‍♀️~~मे पेडणेकर सायकल कंपनी.~~🚴‍♂️~~_*
◆ मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.

*💁🏻‍♂️ वैशिष्ट्ये :*
● योग्य दर. टिकाऊ माल.
● सर्व वयोगटासाठी सायकल उपलब्ध
● जीएसटी बिल मिळेल
● घरपोच डिलिव्हरी मिळेल
● बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध
● घाऊक ,सामाजिक संस्था ,शाळेतील मुलांसाठी सायकल योग्य दरात मिळेल.

*_🚴‍♂️सायकल नेहमी चालवा,..आणि आरोग्यदायी 💚फायदे मिळवा…आजच आपली नवीन सायकल खरेदी करा .._*

*📞संपर्क – श्री शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*📲9356883693*
*📲8108285128*

*📞पत्ता -* मे पेडणेकर सायकल कंपनी मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.
सिंधुदुर्ग 416510
*आमच्या असंख्य ग्राहकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!