मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्र सरकारचा केला निषेध
*🟥मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्र सरकारचा केला निषेध*
*🟥मालवणात काॅग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि.:१ एप्रिल*
: वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने आज (गुरुवारी) मालवणात अनोखं आंदोलन केलं आहे. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने चक्क मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध नोंदवला. शहरातील फोवकांडा पिंपळ येथे हे आंदोलन करण्यात आले.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस कडून महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन करण्यात येत आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मालवण येथे फोवकांडा पिंपळपार येथे मोटर सायकल व गॅस सिलिंडर रस्त्यावर ठेऊन त्यांना पुष्पहार घालून महागाई मुक्त भारतसप्ताह आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, आप्पा चव्हाण, महेंद्र मांजरेकर, युवक माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, श्रेयस माणगावकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, योगेश्वर कुर्ले, श्रीहरी खवणेकर, चंदन पांगे, अमृत राऊळ, सरदार ताजर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दर दिवशी गॅस व इंधन दरवाढ कशी होत आहे याचा पाढा मेघनाद धुरी यांनी वाचला. ही वाढ सामान्य जनतेला परवडणारी नाही, महागाई कमी करण्याच्या आश्वासनला भाजप पक्ष जागला नाही अशी टीका बाळू अंधारी यांनी केली. तर अशीच दर वाढ होत राहिल्यास पुन्हा चुली पेटवाव्या लागतील व आम्हाला देखील मातीच्या चुलीचं वाटप करावं लागेल, असे अरविंद मोंडकर म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_______________________
*बंपर ऑफर.. 💥बंपर ऑफर..💥 बंपर ऑफर..*
💻 *आस्था कॉम्प्युटर शॉपी सावंतवाडी* 🖥️
🥳 *घेऊन आलेत गुढीपाडवा ते अक्षय तृतीया (1एप्रिल ते 5 मे) या काळात विशेष ऑफर..*
*बजाज फायनान्सच्या 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर* 🥳💥💃
🏫🏃🏻♂️ *बॅक टु स्कूल ऑफर* 🏃🏻♀️🏫
👉 *लॅपटॉप खरेदीवर मिळवा १०,००० पर्यंतचे फायदे*
⌚4999/- किमतीचे fire bolt Smart Watch(touch screen)
🖱️899/- किमतीचा HP Wireless Mous
🛡️4999/- किमतीची 3 years Warranty
💊1500/- किमतीचे antivirus सॉफ्टवेअर
👉 [ _वरील सर्व ऑफर साठी छोटीशी प्रोसेसिंग फी भरणे आवश्यक_ ]
*🟦Dell 🟦Lenovo 🟦HP 🟦Acer 🟦ASUS*
👆 वरील नामवंत ब्रँडचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये असणारे😇
*सिंधुदुर्गातील एकमेव☝️MULTIBRAND शॉप*
👉 *नवीन बजाज EMI कार्डसाठी* 👇
❇️आधार कार्ड ❇️पॅन कार्ड ❇️बँक पासबुक
👉पूर्वीचे बजाज EMI कार्ड असल्यास कमीत कमी प्रोसेसिंग फी🥳
👉 बजाज EMI लोनसाठी (24 वर्ष वय पूर्ण , लॅपटॉप च्या किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट खरेदी वेळी आगाऊ आवश्यक आणि उरलेल्या रकमेचे 0% व्याजाने ६/८/१० महिन्यांचे समान हप्ते )
👉 *लवकर भेट द्या आणि आपल्या पसंतीचा लॅपटॉप मिळवा विशेष ऑफर्स सह*🏃🏻♀️🏃🏻♂️
🏬 *पत्ता :* *आस्था कॉम्प्युटर शॉपी, एसटी स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज, सावंतवाडी*
📱 *संपर्क :* 9405099961 / 7410594492 / 02363275959 /9405099963
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

